एडस् नियंत्रण समितीची यंत्रणा जिल्ह्यात कार्यशील-जिल्हाधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर, : केवळ पाट्या नटाकता समाजाचं काहीतरी देण लागतोय, या भावनेतून जिल्हा एडस् नियंत्रण समितीची यंत्रणा जिल्ह्यात काम करत आहे. ही यंत्रणा जिल्ह्यात कार्यशील आहे, गौरवोद्गार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढले.
इंडो काऊंट फौंडेशनच्या सहकार्याने सीपीआर रुग्णालयातील जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण पथकाचे कार्यालय नुतनी करण करण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांच्या हस्ते आज करण्यात आले. फौंडेशनच्या वतीने कार्यालयाच्या नुतनी करणाबरोबरच 12 संगणक आणि 12 फ्रीज देण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, या कार्यालयाची यंत्रणा स्वत: झोकून देवून काम करत असते. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून फौंडेशनही काम करत आहे. आरोग्य विभागाने जिल्हाभर एखादी मोठी मोहीम फौंडेशनच्या माध्यमातून राबवावी. त्यांचा उद्देश कौतुकास्पद आहे.
फौंडेशनचे संचालक कमल मित्रा यावेळी म्हणाले, खरतर जिल्हाधिकारी यांनी महापूर आणि कोरोना काळात केलेले काम आम्हाला प्रेरणा देणारे आहे. हीच प्रेरणा घेवून कार्डीयाक विभागातील महिला विभागाचे आणि या कार्यालयाचे नुतनीकरण केले आहे. कोल्हापूरमधूनच आम्ही मोठे झालो आहोत. या शहराच्या विकासात हातभार लावताना मला निश्चितच आनंद होत आहे. यापुढेही सहकार्य करु असेही ते म्हणाले.
यानंतर झालेल्या समितीच्या बैठकीत, जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामार्फत कोरोना काळात महिन्याला 5 हजार या प्रमाणे 3 महिने 312 सेकस वर्कर महिलांना मदत देण्यात आली. तसेच शाळेत जाणाऱ्या या महिलांच्या 12 मुलांना महिना 2 हजार 500 आसे तीन महिने मदत देण्यात आली. त्याबाबत जिल्हाधिकारी आणि समितीचे विशेष आभार मानण्यात आले.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. याप्रसंगी वैद्याकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए.डी. माळी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, डॉ. विलास देशमुख डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी. जी. काटकर आदी उपस्थित होते.