कोल्हापूर २४ फेब्रुवारी २०२१ : भारतातील अनेक ट्रम्प टॉवर्सचे विकासक ट्रीबेका ने पुणे येथील एनआयबीएम रोडवरील व्हॉएज टू द स्टार्स या १.३ दशलक्ष चौरस फुटांवरील अत्यंत आलिशान अशा प्रकल्पातील ५१ टक्केपैकी बहुतेक भागाचे संपादन पूर्ण केले आहे. भारतीय रियल इस्टेट बाजारपेठेतील ते एक सर्वात गतिमान असे एकत्रीकरण मानले जात आहे. रियल इस्टेट बाजारपेठ आता हळूहळू पूर्वपदावर येत असताना ट्रीबेका साठी पुणे ही एक महत्वपूर्ण अशी बाजारपेठ आहे.
व्हॉएज टू द स्टार्स हे टॉवर पुणे येथील क्षितिजावरील प्रतिष्ठीत प्रकल्पांपैकी एक असून त्यात पुणे येथील पहिला टेरेस डेक उभारला गेला आहे. त्यातून या परिसरातील सर्वात आलिशान आणि सिग्नेचर शैलीतील हे प्रकल्प उभे राहत आहेत. हे सर्व पाच टॉवर एकमेकांशी संलग्न असून अडीच एकरांचा मनोरंजन डेक त्यातून निर्माण झाला आहे. हा परिसर त्यातून अत्यंत सुंदर आणि भव्य दिसतो. सर्वच वयोगटांमधील लोकांसाठी हा प्रकल्प विविध सुविधा देवू करतो आणि त्यातून आलिशान आयुष्यप्रणालीचे एक आगळे परिमाण साध्य होते. या प्रकल्पामध्ये ग्राहकांना जागतिक दर्जाची घरे देवू केली जातील. व्हॉएज टू द स्टार्स मध्ये आधुनिक तंत्रज्ञान देवू केले गेले असून त्यातून हा प्रकल्प भारतातील एक आगळा वेगळा आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्वोत्तम प्रकल्प ठरणार आहे.
येथील प्रत्येक टॉवरमध्ये ६८ घरे असून प्रत्येक मजल्यावर चार घरे आहेत. एकूण पाच टॉवरमध्ये एकूण ४०० घरे असतील. या प्रकल्पामध्ये केवळ ३ आणि ४ बेडरूमची घरे असून त्यांच्या किंमती २-२.५ कोटी रुपयांपासून सुरु होतात. पाच टॉवरपैकी टॉवर ए मधील सर्व घरांचा ताबा आधीच दिला गेला आहे. टॉवर बी आणि टॉवर सीमधील घरांचा ताबा हा अनुक्रमे २०२१ आणि २०२२ मध्ये दिला जाणार आहे. टॉवर डी आणि टॉवर इमधील घरांचा ताबा २०२३ देण्याचे नियोजन आहे.
एनआयबीएम हे स्थळ रहिवाशांना नागरी कोलाहलातून शांतता आणि हरित वातावरण देवू करते. त्याचबरोबर हा प्रकल्प खऱ्या अर्थाने आलिशान रहिवासासाठी आदर्शवत आहे. हा प्रकल्प मध्यवर्ती ठिकाणी असून शहरातील सर्वोत्तम अशा शाळा, मॉल्स, हॉटेल, रुग्णालये तसेच पुणे येथील आंतररास्ट्रीय विमानतळापासून तसेच रेल्वे स्थानकापासून अगदी जवळच आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अत्यंत आलिशान अशी जीवनशैली प्राप्त होते आणि त्याद्वारे हा प्रकल्प ३ आणि ४ बीएचकेची प्रशस्त अशी घरे देवू करतो. ज्यांना शांततापूर्ण असे जीवन जगायचे आहे अशा लोकांसाठी त्याद्वारे हा एक अत्यंत आदर्शवत असा प्रकल्प आहे.
ट्रीबेका चे संस्थापक श्री कल्पेश मेहता म्हणाले, पुणे या रियल इस्टेट क्षेत्रातील आणखी एका महत्वाच्या अशा शहरामध्ये विस्तार करायला मिळतो आहे, ही आमच्यासाठी एक महत्वपूर्ण अशी बाब आहे. हा एक अत्यंत आदर्शवत असा प्रकल्प असून तो आत्तापर्यंतच्या आमच्या प्रकल्पांमध्ये सर्वोत्तम असा आहे. ट्रम्प संलग्नतेच्या माध्यमातून जे प्रकल्प तयार झाले त्यांमध्ये साजेसा असा हा प्रकल्प आहे. या अत्यंत देखण्या अशा प्रकल्पाच्या शुभारंभाची आखणी करण्यास आम्ही उत्सुक आहोत.
ते पुढे म्हणाले, आमच्या अॅसेट लाइट धोरणामुळे आम्ही ज्या गोष्टी सर्वोत्तम करतो त्यांवर लक्ष केंद्रीत करण्यास मदत होते. डीझाइन, बांधकाम आणि विक्री या गोष्टींमध्ये आमचा हातखंडा असून जमिनीच्या मालकीमध्ये आमचा हातखंडा नाही कारण त्यासाठी वेगळे आणि कठीण कौशल्य लागते आणि उच्चतम भांडवल जोखीम त्यात गुंतलेली असते.