उष्ण हवामानामुळे श्वासोच्छवासाची समस्या, खोकला, घरघर होणे आणि नाक आणि घशातील जळजळ आणि दमा किंवा क्रॉनिक ऑबस्ट्रक्टीव्ह पल्मनरी डिसीज (सीओपीडी) संबंधीत लक्षणे उद्भवू शकतात. उन्हाळयाला सुरुवात झाल्याने उष्णता व आर्द्रता कमी करणे आणि आपला श्वासासंबंधी अडचणी दूर करणे ही काळाची गरज आहे. उन्हापासून दूर रहा, उष्णता टाळा आणि गरम आणि दमट परिस्थितीत मुक्तपणे श्वास घेण्यासाठी आपण घेऊ शकता अशा काही महत्त्वाचे टप्पे आपण घरास थंड ठेवू शकता.
गरम हवामानाचा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला त्रास होऊ शकतो. आपल्याला दमा, ब्राँकायटिस किंवा क्रोनिक ऑबस्ट्रक्टीव्ह पल्मनरी डिसीज (सीओपीडी) अशा समस्या उद्भवल्यास श्वास घेण्यास संघर्ष करावा लागू शकतो. गरम हवामान आणि वातावरणातील दमटपणामुळे आपली लक्षणे आणखी तीव्र होऊ शकतात आणि यामुळे आपल्या श्वासोच्छवासाच्या समस्या आणखीनच वाढू शकतात. उन्हाळ्यात परागकणांचे प्रमाण जास्त असते आणि यामुळे श्वासोच्छवास, श्वास लागणे, खोकला, नाक वाहणे, सर्दी आणि थकवा येणे यासारख्या श्वसनाचे आजार होऊ शकतात. खालील उपायांचा वापर केल्यास उन्हाळ्याच्या दिवसातही श्वासासंबंधी तक्रारी उद्भवणार नाहीत
– उन्हात व्यायाम करण्याऐवजी आपण घरीच कसरत केली पाहिजे. भर उन्हात पळू नका. खोली योग्य प्रकारे हवेशीर असावी हे पहा. जास्त तापमानात तसेच उष्णतेच्या दिवसांमध्ये जास्त कसरत करणे टाळा.
– सक्रिय आणि निष्क्रिय धूम्रपान, प्रदूषक आणि एलर्जेन टाळा.
– जर आपल्याला दमा असेल तर औषधोपचारांबाबत हयगय करू नका. असे केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.
– घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या परिसरातील हवामान तपासा. सकाळी ११ ते दुपारी ४ च्या दरम्यान बाहेर जाण्यास टाळा. शक्यतो संध्याकाळच्या वेळी घराबाहेर पडा. परागकण आणि प्रदूषणाची पातळी आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते कारण ते आपल्या फुफ्फुसाच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम करतात. घरी असाल तर रहदारीच्या रस्त्यांवरुन प्रवास करणे टाळा आणि शक्य असल्यास एअर कूलरची निवड करा. जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असेल तर आपणास घराबाहेर जाण्याची गरज आहे तर टोपी किंवा स्कार्फ घालून स्वतःचे संरक्षण करा. सनस्क्रीनचा वापर करा.
– जर आपण घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला लागणा-या महत्त्वाच्या वस्तू सोबत न्यायला विसरु नका जसे की तुमची औषधं आणि पाण्याची बाटली.
– जास्त प्रमाणात थंड पाण्याचे सेवन करणे टाळा, यामुळे आपल्या फुफ्फुसांचा त्रास होऊ शकतो. तुम्हाला डिहायड्रेट करणा-या शीतपेयांचे सेवन करणे टाळा.
– आपण थंड पाण्याच्या शॉवरची निवड देखील करू शकता किंवा ताजे राहण्यासाठी आपल्या चेहर्यावर काही थंड पाण्याचा फवारा मारु शकता.
– कोशिंबीर आणि फळे खा आणि जंक फुड, मसालेदार, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा.
– आपले घर थंड ठेवा. दिवसा वेळी खिडक्या उघडया ठेवण्याचे टाळा.