कोल्हापूर – प्रतिनिधी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरती सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील प्रभागांमध्ये जनसेवक श्रद्धा महागावकर यांच्या वतीने पेशंट केअर योजना राबवली जाणार आहे.
पेशंट केअर या योजने अंतर्गत प्रभागामधील विविध रोगांवरील मासिक औषधांकरता 15 ते 20 टक्के सवलत मिळणार असून याचा लाभ प्रभागांमधील ज्येष्ठ नागरिक तसेच विविध व्याधींनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना होणार आहे. त्याच बरोबर कोणत्याही आरोग्य तपासणीसाठी ५० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. श्रद्धा महागावकर यांच्या पुढाकाराने पेशंट केअर ही योजना क्रांतिसिंह नाना पाटील व जिवबा नाना पार्क या प्रभाग क्रमांक ८१ मध्ये राबवली जाणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती नाव नोंदणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला उच्च दर्जाचा वाफेचा यंत्र श्रद्धा महागावकर यांच्यावतीने भेट दिले जाणार आहे. एका कुटुंबासाठी एक नोंदणी आवश्यक असून संपूर्ण कुटुंबाला याचा लाभ घेता येणार आहे. तीन वर्षासाठी पेशंट केअर योजने अंतर्गत नागरिकांचे सभासदत्व वैद्य राहणार आहे. ज्या नागरिकांना या योजनेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी अरिहंत रेसिडेन्सी गाळा – दहा, क्रांतिसिंह नाना पाटील नगर या ठिकाणी संपर्क कार्यालय मध्ये आपली नाव नोंदणी करून पेशंट केअर योजनेचे लाभार्थी व्हावे असे आवाहन जनसेवक श्रद्धा महागावकर यांनी सांगितले.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून प्रेरणा.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती राबवलेल्या रक्तदान या महाशिबिरातून प्रेरणा घेऊन माझा प्रभाग माझी जबाबदारी या अंतर्गत पेशंट केअर ही योजना सुरू केल्याचे श्रद्धा महागावकर यांनी सांगितले.
समाजकार्याचा वारसा.
कोल्हापूरचे प्रथम खासदार भाऊसाहेब महागावकर यांनी आपल्या सामाजिक कार्यामधून मोठा लोकसंग्रह निर्माण केला होता. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महागावकर परिवाराच्या वतीने ही पेशंट केअर योजना राबवली जात असल्याने कोल्हापूर शहरामध्ये त्यांचे कौतुक होत आहे.