अमेझॉन ने जाहीर केला २५ कोटी डॉलर चा “अमेझॉन संभव व्हेंचर फंड” – डिजिटल स्वावलंबी भारत हे चित्र साकार होण्याच्या प्रक्रियेला गती देणार; लघु-मध्यम उद्योग, शेती आणि आरोग्यसेवा यांचे डिजिटायझेशन करणा-या स्टार्ट अप व्यवसायांना आणि उद्योजकांना निधीसाठी प्राधान्य
· अमेझॉन १० लाख स्थानिक दुकानदारांना २०२५ पर्यंत अमेझॉन डॉट कॉम मध्ये सामील करून घेणार
· ‘स्पॉट लाइट नॉर्थ इस्ट ‘ हा नवा उपक्रम जाहीर; ईशान्य भारतात स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देणार, रोजगार निर्माण करणार, संपूर्ण प्रदेशातील महिला आणि आदिवासी जमातींचे वित्तीय समावेश आणि सबलीकरण करणार
· अमेझॉन चे २०२५ पर्यंत १ कोटी लघु-मध्यम उद्योगांचे डिजिटायझेशन, १० अब्ज डॉलर ची निर्यात आणि १० लाख रोजगार उद्दिष्ट अधोरेखित करणारे नवे उपक्रम
अमेझॉन इंडिया ने आपल्या संभव या प्रमुख उद्योजक मेळाव्याच्या उद्घाटनाच्या सत्रात आज २५ कोटी डॉलर चा अमेझॉन संभव व्हेंचर फंड सुरु केल्याची घोषणा केली. लघु-मध्यम उद्योग, शेती आणि आरोग्यसेवा यांचे डिजिटायझेशन घडवून आणण्यासाठी या निधीतून डिजिटल इंडिया विकसित करण्यासाठी काम करणा-या तंत्रज्ञान-प्रेरित स्टार्ट अप व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली जाईल असे अमेझॉन इंडिया ने जाहीर केले. लघु-मध्यम उद्योगांचे डिजिटायझेशन करण्यासाठीच्या उत्तमोत्तम संकल्पनांना चालना देणे, कृषि क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या आधारे नवे प्रवाह सुरु करून शेतक-यांची उत्पादकता सुधारणे आणि सर्वोत्तम कृषि उत्पादने ग्राहकापर्यंत आणणे, आणि तंत्रज्ञानाचा वापर करीत चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा सर्वांपर्यंत पोचवणे यावर या निधीचा भर असेल.
लोकल शॉप्स ऑन अमेझॉन या कार्यक्रमांतर्गत अमेझॉन १० लाख स्थानिक दुकानदारांना २०२५ पर्यंत अमेझॉन डॉट कॉम मध्ये सामील करून घेणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली . याच मेळाव्यात अमेझॉन ने स्पॉट लाइट नॉर्थ इस्ट हा नवा उपक्रम जाहीर केला. ईशान्य भारतातील ८ राज्यांमधल्या ५०,००० कारागीर, विणकर आणि लघु उद्योग यांना २०२५ पर्यंत ऑन लाइन व्यवहारांमध्ये समाविष्ट करून घेणार आणि चहा, मसाले आणि मध या स्थानिक उत्पादनांची निर्यात वाढविणार असल्याचेही अमेझॉन ने जाहीर केले. अमेझॉन चे नियोजित प्रमुख कार्यकारी अधिकारी अँडी जस्सी आणि अमेझॉन इंडिया चे प्रमुख तसेच अमेझॉन ग्लोबल व्हाइस प्रेसिडेंट अमित अगरवाल यांच्या फायरसाइड या संभाषणात हे नवे निर्णय जाहीर झाले. या संभाषणात उभयतांनी भारताच्या अमर्याद क्षमतांना वाट करून देण्यासाठीची वचनबद्धता ध्वनित केली.
अमेझॉन इंडिया चे प्रमुख तसेच अमेझॉन ग्लोबल व्हाइस प्रेसिडेंट अमित अगरवाल संभव २०२१ मध्ये म्हणाले, “ २०२० मध्ये आम्ही २०२५ पर्यंत १ कोटी लघु-मध्यम उद्योगांचे डिजिटायझेशन, १० अब्ज डॉलर ची निर्यात आणि १० लाख रोजगार निर्मिती हा संकल्प जाहीर केला. आमच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून भारतात डिजिटल व्यवहारांच्या सर्वा शक्यतांना उत्तेजन देत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या आत्मनिर्भर भारत या प्रक्रियेत सहभागी होणार आहोत.