कोल्हापूर ता.07 : महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमी, बापट कँम्प, कसबा बावडा तसेच कदमवाडी येथे मृतदेहांवर महापालिकेच्यावतीने मोफत अंत्यविधी करण्यात येतो. सध्या कोविड -19 चा प्रार्दुभाव वाढलेने मृत्युंच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना बाधीतांची मृत्यूसंख्या वाढत असलेने त्यांच्यावर कराव्या लागणाऱ्या अंत्यविधीसाठी शेणी व लाकूड भविष्यात कमी पडू नये म्हणून महापालिकेच्या स्मशानभूमीस शेणी दान करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. सध्या महानगरपालिकेकडे पुरेशा प्रमाणात शेणी, लाकूड व गॅस सिलेंडर उपलब्ध आहे. परंतु कोवीड -19 चा प्रार्दुभाव पुढील काही महिने राहिल्यास अंत्यविधींसाठी पुरेश्या प्रमाणात लाकूड व शेणी मुबलक उपलब्ध असणे आवश्यक आहे. महानगरपालिकेकडून लाकूड व शेणी खरेदीची प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. तरी शहरातील सर्व सेवाभावी संस्था, तरुण मंडळे, तालीम मंडळे, दानशुर व्यक्ती व नागरिकांना महापालिकेच्यावतीने जाहीर आवाहन करणेत येते की, मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी महानगरपालिकेच्या स्मशानभूमीस शेणीदान करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.