कोल्हापूर ता.07 : महापालिकेच्या कोवीड केअर सेंटरसाठी रोटरी क्ल्ब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रम यांच्याकडून औषधे देण्यात आली. सदरची औषधे महापालिकेच्या कर्मवीर विठठल रामजी शिंदे चौकात प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडे दिली. महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन रोटरी क्ल्ब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रम यांनी (Inj. Nexa, Inj.PIP T, Inj.Rednisol A 40, Nexaparin 60, Vasfix 20, Vasofix 22, PPE Kit, N95 mask, 2.5ML Dispovan) इत्यादी औषधे दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त रविकांत आडसूळ, आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, उपशहर अभियंता नारायण भोसले, संस्थेचे अध्यक्ष विश्वजीत जाधव, सचिव प्रदीप भारमल, खजानिस गौतम परमार, विद्यानंद बेडेकर, रणजीत झेंडे, गिरीश वाघ, विजय माणगावकर, कुलदिप जाधव, संदीप मिरजकर, संभाजी जाधव, सचिन बेनाडे, धनजंय जाधव, संतोष चिकणे, विजय पांढरे,आदी सदस्य उपस्थित होते.