आज ज्येष्ठ नागरिक संघ व विविध संघटना यांचेसाठी शासन विविध योजना तयार करीत असून या योजनांचा लाभ सर्व जेष्ठ नागरिकापर्यंत पोहाचविणे गरजेचे आहे यासाठी ज्येष्ठामध्ये याबाबत जागृती करणे गरजेचे आहे असे आवाहन पुणे येथील ज्येष्ठ नागरिक अभ्यासक अरुण रोडे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर च्या आजीवन अध्ययन व विस्तार अधिविभागाच्या वतीने जेष्ठ नागरिकांसाठी व्याख्यानमालेच्या तिसरे पुष्प गुंफताना श्री. रोडे बोलत होते यावेळी आजीवन अद्यान व विस्तार अधिविभागाचे प्र. संचालक प्रा. डॉ. ए. एम. गुरव गस उपस्थित होते. या व्याख्यानालेसाठी महाराष्ट्रातून विविध भागातून ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
श्री. रोडे पुढे म्हणाले की, राज्य व केंद्र शासन आज ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध योजना तयार करीत आहे या योजना मुल लाभार्थीपर्यंत पोहचत नसल्यामुळे व काही वेळा होत असलेली शासकीय दिरंगाई यामुळे या योजनांचा लाभ ज्येष्ठांना मिळत नाही यासाठी जागृती करणे गरजेचे आहे.
आज जागतिक पातळीवर जेष्ठ नागरिकांच्या संदर्भात मोठे काम सुरु असून त्याचे प्रतिबिंब आज देशात व राज्यात उमटण्यास सुरवात झाली आहे. यामुळे केंद्र व राज्य शासन विविध उपक्रम हाती घेत आहे. या उपक्रमात स्थानिक संघटनांनी लक्ष घालून याचा अधिकाधिक ज्येष्ठांना लाभ मिलावानिसाठी प्रयत्न करावेत
शासनाच्या धोरण, कायदे व योजनाचा अभ्यास नसल्यामुळे अनेक समस्या येतात याबाबींचा अभ्यास करणे अतंत्य आवश्यक असून यासाठी संघ व संघटना यांनी पुढाकार घ्यायाल हवा आहे.
संघटनेमध्य नव्या लोकांना अधिक संधी देवून जुन्या सभासदांनी त्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका बजावणे गरजेचे आहे. नव्या सदस्यांनी प्रत्येक संघाच्या ठिकाणी ग्रंथालय असणे अत्यंत आवश्यक असून अशी ग्रंथालये स्थापन करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती घेवून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
श्री. रोडे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी असणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या विवध योजांची क्रमवार माहिती देवून त्यासाठी आवश्यक पात्रता व त्यामधील अडचणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कोविड १९ काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांना येणारी समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा.
यावेळी प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांनी ज्येष्ठ नागरिकांनी आपली बाल्यावस्था जोपासण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले. लहान बालके साजही कोणत्याही अपेक्षेशिवाय आनंदी जीवन जगतात त्याप्रमाणे आपणही जीवन व्यतीत केले पाहिजे. चांगल्या संगतीमधून आनंद निर्माण करता करत येतो यासाठी चांगले छंद जोपासणे गरजेचे आहे.
शेवटी श्री. अतुल एतावडेकर यांनी यांनी सर्वांचे आभार मानले.