कोल्हापूर ता.14 :- कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत महत्वकांक्षी कोविड लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यामध्ये हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्कर यांचा समावेश होता. दुस-या टप्प्यामध्ये 45 वर्षावरील सर्व नागरीकांचा लसीकरणामध्ये समावेश करणेत आला.
शनिवार दिनांक 15 मे 2021 रोजी पुरेशी लस उपलब्ध नसल्यामुळे महापालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण बंद राहणार आहे. याची नोंद सर्व नागरीकांनी घ्यावी असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकडे यांनी केले आहे.