माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस पक्षाच्यावतीने सांगली शहरात ठिकठिकाणी राजीव गांधी यांचा फोटो व काँग्रेसचा लोगो असलेले चार हजार मास्क तसेच सॅनिटायझर आणि कोविड संबंधित औषधांचे किट वाटप करण्यात आले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम आणि शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते हे वाटप झाले.
सकाळी काँग्रेस भवनयेथे राजीव गांधी यांच्या प्रतिमेला मोहनराव कदम आणि पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. यानंतर राजीवजी गांधी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. राजीव गांधी यांची प्रतिमा असलेले मास्क अनेक ठिकाणी वाटप करण्यात आले. त्याची सुरुवात राजीवजी गांधी यांच्यास पुण्यतिथी निमित्त आज प्रभाग क्र. 9 मधील नगरसेवक संतोष पाटील व नमराह मशीद संचलित नमराह डेडीकेटेड कोवीड सेंटर याला भेट देवून कोवीड रूग्णांच्या उपचाराकरीता लागणारी औषध, सॅनीटायझर तसेच मास्क कोविड सेंटरचे व्यवस्थापक, रहीम मुल्ला यांच्याकडे सुपुर्त केले व यावेळी सांगली शहर युवक काँग्रेसच्या वतीने येथील रूग्ण व नातेवाईकांकरीता जेवणाचे वाटप करण्यात आले.
रस्त्यावर ड्युटी करणारे पोलिस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, रिक्षाचालक, भाजी विक्रेते, व्यापारी यांना व दांडेकर आणि कंपनी मॉलमधील कार्यरत असलेल्या कर्मचारी यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी ओंकार दांडेकर उपस्थित होते.
सांगली ग्रामिण व शहर जिल्हा अल्पसंख्यांक काॅंग्रेस कमिटीच्या वतीने राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काडसिध्देश्वर स्वामी यांचे कनेरी मठ येथील रोग शक्तीवर्धक काढा वाटप करण्यात आले.
राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने ऑनलाइन श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला, त्यामध्ये आमदार मोहनराव कदम आणि पृथ्वीराज पाटील यांनी सहभाग घेतला व सांगली जिल्ह्याचा आढावा सादर केला.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पै. नामदेवराव मोहिते, नगरसेवक संतोष पाटील, दक्षिण ब्लॉकचे अध्यक्ष बिपीन कदम, उत्तर ब्लॉकचे अध्यक्ष रवींद्र खराडे, कुपवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सनी धोत्रे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष महावीर पाटील, अल्पसंख्यांक ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्ष देशभूषण पाटील, अल्पसंख्यांक शहर विभागाचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ पेंढारी, महाराष्ट्र शिक्षक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नेमिनाथ बिरनाळे, अजित ढोले, अमित पारेकर, संतोष भोसले, आशिष चौधरी, मौलाली वंटमुरे, सुएल बलबंड, सचिन चव्हाण, भारती भगत, नामदेव पठाडे, बाबगोंडा पाटील, रहिम हट्टीवाले, प्रशांत देशमुख, महंमद शेख, इर्शाद सोलापुरे, अशोक रासकर, इब्राहीम मुलाणी, डॉ. देसाई, पैगंबर शेख उपस्थित होते.