कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये स्वयंसेवी संस्था ही प्रशासनाच्या बरोबरीने काम करत आहेत. विविध ठिकाणी पदरमोड करून स्वयंसेवी संस्था काम करीत आहेत त्यांनी उभारलेल्या कॉल सेंटरला शासकीय नजरेतून न पाहता लालफितीच्या कारभारात न अडकवता आरोग्य प्रशासनाने सकारात्मक आणि मार्गदर्शन पर मदत करावी अशी आग्रही अपेक्षा माजी आमदार मालोजीराजे छत्रपती केली आहे. चौकातील परिसरातील मावळा कोल्हापूर आणि मानसिंग बोंद्रे चारिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटर शुभारंभ प्रंसगी ते बोलत होते.
आमदार चंद्रकांत जाधव यांनी या कोविड सेंटरला सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन दिले .संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांनी यशवंतराव चव्हाण होमिओपॅथिक कॉलेजमध्ये सुरू झालेले हे कोविड सेंटर ग्रामीण व शहरी सामान्यासाठी आशावादी ठरेल असे सांगितले. मावळा समुहाचे या उपक्रमाचे समन्वयक उमेश पवार यांनी ऑक्सीजन बेड सह सुरू असलेले हे कोविड सेंटर डॉक्टर आणि कार्यकर्त्यांच्या संचासह सज्ज असल्याचे सांगत सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.