मिरर प्रतिनिधी : मराठा महासंघ महिला आघाडी,कोल्हापूर जिल्हा,उजळाईवाडी ग्रामपंचायत,यशस्विनी महिला मंडळ यांच्या पुढाकाराने सिद्धगिरी गुरुकुल फौंडेशन कणेरीमठ,कणेरी या संस्थेच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमा अंतर्गत महिलांसाठी घरगुती मसाले उत्पादन या विषयी मोफत प्रशिक्षण घेण्यात आले.या प्रशिक्षण मध्ये वेगवेगळ्या मसाले,चाट ,पुलाव, बिर्यानी, पंजाबी, साभार व गरम मसाले या प्रकारचे मसाले व शेंगदाणे, जवस, लसूण, खोबरे या प्रकारच्या चटण्या बनविण्याचे प्रशिक्षण मोफत देण्यात आले.युवा ग्रामीण विकास संस्था गोकुळ शिरगावच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य जनजागृती करण्यात आली.
उजळाईवाडी, ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणासाठी लोकनियुक्त सरपंच सुवर्णा माने,उपसरपंच सारंगा नाईक,सौरभ वायगणकर,सुनीता गुरव,गीता पाटील, सुनीता पाटील,शिल्पा महाजन,प्रजवल तांबे,यशस्विनी महिला गट अध्यक्षा शैलजा भोसले(मराठा महासंघ महिला जिल्हाध्यक्षा),ग्रा.प. सदस्या सोनाली मजगे,अनुराधा घोरपडे, सारिका कासार, रागिणी चव्हाण,माधवी पाटील,वैजती राऊत,मंजुषा धनवडे,एम जी सातपुते, प्रल्हाद कांबळे, युवा टीम उपस्थितीत होती.प्रास्ताविक शैलजा भोसले व आभार संध्या भोसले यांनी मानले.