विधायक सामाजिक उपक्रमांचे होणार आयोजन
कोल्हापूर, दि. १०:पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ हे गोरगरिबांचे नेते आहेत. त्यांचा वाढदिवस तिथीनुसार बुधवारी दि. १७ म्हणजेच श्री. रामनवमी दिवशी होत आहे. सबंध जिल्हाभर हा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करूया, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत श्री. आसुर्लेकर- पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बैठकीच्या सुरुवातीला इचलकरंजीचे नगरसेवक नितीन जांभळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
श्री. पाटील पुढे म्हणाले, पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यानी गेल्या ३५-४० वर्षांची सामाजिक आणि राजकीय वाटचाल गोरगरीबांच्या कल्याणासाठी खर्ची घातली. त्यांचे आणि गोरगरिबांचे ऋणानुबंध घट्ट आहेत. या लोकनेत्याचा वाढदिवस आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, रुग्णांना फळे वाटप, विविध देवतांच्या आरत्या अशा सामाजिक उपक्रमांनी साजरा करा.
राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल साळोखे म्हणाले, प्रभू श्रीराम नवमीदिवशी राष्ट्रवादीच्या मार्केट यार्डमधील जिल्हा कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला जाणार आहे.
राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. शितल फराकटे म्हणाल्या, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी महिलांसाठी कार्यक्रम व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करू.
कोल्हापूर शहराध्यक्ष आदिल फरास म्हणाले, संपूर्ण कोल्हापूर शहरभर विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करू
पन्हाळा तालुकाध्यक्ष संतोष धुमाळ म्हणाले, श्री ज्योतिबा देवाच्या अभिषेकासह बालग्राममध्ये फळे वाटप व पन्हाळ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करणार आहोत.
करवीरचे तालुकाध्यक्ष मधुकर जांभळे म्हणाले, मिरजकर तिकटी येथील अंध मुलांना अन्नधान्य वाटप करणार आहोत.
कागल तालुकाध्यक्ष विकास पाटील म्हणाले, संपूर्ण तालुकाभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करणार आहोत.
जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे म्हणाले, गगनबावडा येथे गोरगरीबांना ५०० चादरींचे वाटप व मुडशिंगी येथील अंधशाळेच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करणार आहोत.
हातकणंगले तालुकाध्यक्ष शिरीष देसाई म्हणाले, पट्टणकोडोली येथे श्री. बिरोबा देवाच्या अभिषेकासह फळे वाटप करणार आहोत.
गोकुळ दूध संघाचे संचालक प्रा. किसन चौगुले म्हणाले, राधानगरी तालुक्यात रक्तदान शिबिरासह शालेय मुलांना साहित्य वाटप करणार आहोत.
केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई म्हणाले, आजरा तालुक्यामधील मंदिरांमध्ये महाआरतीसह रक्तदान शिबिरांचे आयोजन करणार आहोत.
इचलकरंजी शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे म्हणाले, रक्तदान शिबिरासह आय. जी. एम. हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळे वाटप करणार आहोत.
भुदरगड तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार म्हणाले, गारगोटी येथे रुग्णांना फळे वाटप करणार आहोत.
यासीन मुजावर म्हणाले, जिल्हा अल्पसंख्यांक सेलच्यावतीने तारदाळ येथील माऊली वृद्धाश्रमात धान्य वाटप करणार आहोत.
अब्दुलहमीद मिरशिकारी म्हणाले, कोल्हापूर शहर अल्पसंख्यांक सेलच्यावतीने शंभर गरजू कुटुंबांना एक महिन्याचे अन्नधान्य वाटप करणार आहोत.
यावेळी माजी महापौर उदयभाऊ साळोखे, जिल्हा महिला अध्यक्षा सौ. शितल फराकटे, कोल्हापूर शहराध्यक्ष आदिल फरास, जिल्हा युवकचे अध्यक्ष नितीन दिंडे, केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई, माजी संचालक असिफ फरास, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक प्रा. किसन चौगुले, बिद्रीचे संचालक पंडितराव केणे, माजी संचालक सुनील कुंभार, कोल्हापूर शहर महिला अध्यक्षा रेखा आवळे, अमित गाताडे, शितल तिवडे, जहिदा मुजावर, उत्तम कोराने, माजी महापौर परिक्षित पन्हाळकर, नाना आयरेकर, फिरोज सौदागर, सुनील पाटील, सतीश लोळगे, महेंद्र चव्हाण अब्दुलहमीद मीरशिकारी, संध्या भोसले, शितल तिवडे, पूजा साळोखे, डी. के. भास्कर, प्रसाद उगवे आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत महिला जिल्हाध्यक्ष सौ. शितल फराकटे यांनी केले. जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी प्रास्ताविक केले. करवीर तालुकाध्यक्ष मधुकर जांभळे यांनी आभार मानले.