पवित्र आणि निस्वार्थ वृत्तीचा नाश करण्याची क्षमता विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही. हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य डोळ्यासमोर ठेवून गंगाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व गंगनाथ महाराजांची संजीवन समाधी असलेल्या उल्हसित , आनंददायी आणि ऊर्जादायी वातावरण लाभलेल्या हत्ती बेटाच्या विकासपर्वाचे भावकाव्य म्हणजे हत्तीबेट महात्म्य होय.असे मत व्ही.एस. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. [. ]चला कवितेच्या बनात या चळवळीच्या माध्यमातून अमर्याद ज्ञान मर्यादित वेळेत प्राप्त करून घेणे आणि आजच्या पिढीत वाचन संस्काराची रुजवणूक करणे यासाठी अविरत आणि सातत्याने चालू असलेल्या वाचक संवादचे २५५ वे पुष्प दैनिक लोकमत चे पत्रकार व्ही.एस. कुलकर्णी यांनी सुनंदा सरदार लिखित हत्तीबेट महात्म्य या साहित्यकृतीवर संवाद साधून गुंफले. राज्य शासनाचा संत तुकाराम महाराज वनग्राम प्रथम पुरस्कार प्राप्त हत्ती बेटाची पौराणिक ऐतिहासिक घटना पासून ते आजपर्यंतच्या सर्व घडामोडींचा आढावा घेतला. हत्तीबेट महात्म्य हे भाव काव्य आहे. यात सर्व भावना विविधतेने नटलेल्या बेटाचे ओवीबद्ध लेखन केले असून बेटाचे भौगोलिक वर्णन, त्याचा इतिहास येथे आलेले संत-महात्मे भक्तगण आदींचे वर्णन अत्यंत प्रभावीपणे मांडले. लेखिका सुनंदा सरदार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या वाचक संवादात कुलकर्णी यांनी स्वतः केलेल्या कार्यातील आलेल्या अडचणी आणि लाभलेले यश यासह अनेक पैलूंवर प्रकाश टाकला.
यावेळी झालेल्या चर्चेत प्रा.माधुरी नायगावकर, दिपक बलसुरकर ,व्ही.एस बिरादार यांचेसह अनेकांनी सहभाग नोंदवला. उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथ भेट देण्यात आली.पाहुण्यांना सन्मान चिन्ह, आभार पत्र आणि ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्षीय समारोप करताना सुनंदा सरदार यांनी यातल्या कथानकावर प्रकाश टाकला.
शासकीय दूध डेअरीच्या सभागृहात संपन्न झालेल्या संवादाची सुरवात प्रताप सिंह चव्हाण यांचे सुमधुर आवाजातील स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक अनंत कदम यांनी केले तर आभार बालाजी सुवर्णकार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रा राजपाल पाटील, योगेश स्वामी , नारायण घटकार यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास अश्विनी देशमुख , ज्योती डोळे, मंगला शेट्ये, राजश्री वजन, योगेश स्वामी, शिवमुर्ती भातंबरे, मारुती रोडगे, अर्जुन सोमवंशी, टी.एस.कांबळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
