कोल्हापूर /प्रतिनिधी : राजर्षी शाहू गव्हर्मेंट बँकेच्या निवडणुकीची सर्व गटातील मतमोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये राजर्षी शाहू सत्तारूढ पॅनेलचे १४ उमेदवार आणि विरोधी परिवर्तन आघाडीचा एकच उमेदवार निवडून आला आहे. रविवार (दि.१९) डिसेंबर रोजी राजर्षी शाहू गव्हर्मेंट बँकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत २०७८८ मतदारांना मतदानाचा अधिकार होता. यापैकी ९२४१ मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला होता. आज झालेल्या मतमोजणीत राजर्षी शाहू सत्तारूढ पॅनेलचे १४ उमेदवार विजयी झाले तर विरोधी परिवर्तन आघाडीचा एकच उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे बँकेवर परत एकदा राजर्षी शाहू सत्तारूढ पॅनेलची सत्ता आली आहे.
राजर्षी शाहू सत्तारूढ पॅनेलचे विजयी उमेदवार- सर्वसाधारण गट- १) शशिकांत तिवले (४८४७), २) रवींद्र पंदारे (४५२०), ३) विलासराव कुरणे (४२०४), ४) रमेश घाटगे (४१४७), ५) सदानंद घाटगे (४१००), ६) मधुकर पाटील (४०८४), ७) रोहित बांदिवडेकर (४०७६), ८) अतुल जाधव (४०२३), ९) अजित पाटील (३८९७) , महिला प्रवर्ग- १) हेमा पाटील-४५६४, २) मनुजा रेणके-३७४६ भटक्या विमुक्त प्रवर्ग- १) अरविंद आयरे-४३७२ * इतर मागास प्रवर्ग- १) संजय खोत -४५३६ , अनुसुचित प्रवर्ग- १) किशोर पोवार-४३९२ • राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार – सर्वसाधारण गट- १०) प्रकाश पाटील (३८५६) आदी विजयी झाले आहेत.