कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) :स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान राबविण्यात येणार आहे. याअनुषंगाने तालुका स्तरावरुन ग्रामस्तरापर्यंत झेंडे विक्री करण्यासाठी वितरीत करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालये, रास्तभाव धान्य दुकानदार व वार्ड कार्यालये येथे दिनांक 10 ऑगस्टपासून तिरंगी झेंडे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. सर्व नागरिक तसेच सर्व खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी या ठिकाणाहून झेंडे प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
