(स्वर्गीय कांताबाई तलवाडकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आयोजित निमंत्रितांच्या आई कवी संमेलनात सादर केल्या एकापेक्षा एक सरस कविता.)
चला कवितेच्या बनात या साहित्यिक सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळ उदगीर आणि झीलकांता इंटरनॅशनल सोशल फाउंडेशन,पुणे. यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय कांताबाई तलवाडकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आयोजित निमंत्रितांच्या आई कवी संमेलनात शीला पाटील, बसवकल्यान, यांनी आईचे सर्वोच्च स्थान दर्शवणारी *तूच घरचे कळस आणि अंगणातील तुळस* ही कविता सादर केली तर इतर सर्व निमंत्रित कविनी एकापेक्षा एक बहारदार आणि तितक्याच आईच्या आठवणींचा गोडवा गाणाऱ्या कवितांची मेजवानी उदगीर करांना दिली. यात कधी हळवे तर कधी उद्विग्न करणाऱ्या कविताही सादर करण्यात आल्या.
प्रसिद्ध साहित्यिका विचारवंत मा. शांताबाई गिरबणे, औराद शहाजानी, यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कविसंमेलनाचे प्रास्ताविक चला कवितेच्या बनातचे संयोजक अनंत चंपाई माधव कदम यांनी केले तर स्वर्गीय कांताबाईंचा परिचय झीलकांता इंटरनॅशनल सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्ष तथा जीएसटी निरीक्षक पुणे डॉ. प्रमिला तलवाडकर यांनी करून दिला.या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सतीश हाणेगावे, प्रदेश संघटक जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र,यांनी केले. यावेळी निमंत्रित कवी शैलजा कारंडे लातूर यांनी ‘क्षणभरासाठी का होईना हो ना माझी माय’, प्रा. नयन राजमाने, लातूर यांनी ‘दोन्हीकडे शिफारशी करणारी आई स्वतःच्या इच्छा आकांक्षांना विसरून जाते’, क्रांती मोरे यांनी ‘जिच्या शिवाय शिवरायांच्या जन्माची कल्पनाच करता येणार नाही’, गझलकार विमल मुदाळे यांनी ‘ माझ्यासाठी तु अमृत सागर काय आणखी हवे मला ‘, परभणीचे प्रसिद्ध गझलकार प्रा.अरविंद सगर यांनी ‘तुझी किंवा तिची आई मलाही वाटते माझी,जगाची हीच संपत्ती अशी जी खाजगी नाही’,नांदेड चे प्रसिद्ध समाजसेवक तथा साहित्यिक डॉ. हंसराज वैद्य यांनी ‘आई माझी छान दिली आहे मला देवानं’, सतीश हाणेगावे यांनी ‘दुःख आणि दारिद्र्याशी माय आयुष्यभर लढायची’,
याशिवाय स्थानिकचे प्रा.बालाजी सूर्यवंशी यांनी आईसाठी जगता यावे, आईच्या नजरे माधुनी दुनियेला बघतायावे’, प्रा. राजपाल पाटील यांनी त्यागुन बाईपण बाळासाठी आईपण जगते आई’, प्रा. नामदेव गरड यांनी ‘मातेची वाणी निर्मळ गंगेचे पाणी’, बालाजी बिरादार यांनी ‘आई आठवाची गाथा’, अश्या एकापेक्षा एक भारदस्त कवीता निमंत्रित कवींनी सादर करून मंत्रमुग्ध केले. यावेळी काव्यमित्र संस्था पुणे चे संस्थापक अध्यक्ष तथा प्रसिद्ध साहित्यिक राजेंद्र सगर, प्रसिद्ध निवेदक विवेक सौताडेकर, उमाकांत मीटकर, मुंबई. युवा उद्योजक बिपीन पाटील, समाज सेवक सतीश पाटील मानकीकर, आदी मान्यवरांच्या सह परिसरातील श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.