इचलकरंजी -अल्टईट्यूड ऑर्गनायझेशन अंतर्गत बँकॉक (थायलंड) येथे वर्ल्ड फिटनेस सुपरमाॅडेल 2023″या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेत विविध देशांमधून 13 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत इचलकरंजीचा सुपूत्र ऋषिकेश अशोकराव पाटील यांने भारताचे नेतृत्व करत उत्तेजनार्थ चौथा क्रमांक प्राप्त केला असून हा किताब मिळविणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. स्पर्धेतील सर्व विभागात ऋषिकेश पाटील यांनी उत्तम कामगिरी करून परिक्षकांचे लक्ष वेधून घेत गुण प्राप्ती केली. यावेळी त्यांच्या सोबत भारताचे नेशन डायरेक्टर म्हणून अमर शामू सोनावणे (सर) यांचा मोलाचे सहकार्य लाभले. तसेच प्रविण खोंद्रे यांचे फिटनेस व व्यायाम संदर्भात मोलाचे मार्गदशन लाभले.वेशभूषा व लूकिंगसाठी मयुरेश अभ्यंकर यांचे सहकार्य लाभले. व तसेच डॉ.अमित देशमुख यांचे मोलाची साथ मिळाली.
या किताबाने मॅंचेस्टर नगरी इचलकरंजीचे नावलौकिक ऋषिकेश पाटील यांनी जगभर केले असून याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यापूर्वी ग्लोबल माॅडेल इंडिया अंतर्गत ओडीसा येथे भारतातून सर्व राज्यातून मुलांचा सहभाग होता त्यामध्ये इचलकरंजी चा ऋषिकेश पाटील याला इंडिया फिटनेस सुपर मॉडेल ही पदवी मिळाली. त्यानंतर नॅशनल कॉलीफाइर होऊन ऋषिकेशने आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधील यशस्वीतेने इचलकरंजीचेच नव्हे तर पूर्ण भारताचे नाव या किताबावर कोरले आहे .यासाठी ग्लोबल मॉडेल इंडियाचे सर्वेसर्वा अमर सोनावणे तसेच मयुरेश अभ्यंकर यांचे त्याला मार्गदर्शन मिळाले ऋषिकेश पाटील यांनी सर्व इचलकरंजीकर तसेच भारतियांचे नाव उज्ज्वल केले आहे. भविष्यात माॅडेलिंग व कलाक्षेत्रात नावलौकिक करण्याचा श्री.पाटील यांचा मानस आहे.
