कोल्हापूर – गर्भलिंग निदान प्रकरणी राजारामपुरीतील एका हॉस्पिटलवर छापा टाकून रुग्णालय व्यवस्थापकाला 15 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडलंय. कोल्हापूर मनपा आरोग्य विभागानं ही कारवाई केलीय.कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाला गर्भलिंग चाचणी होत असल्याची माहिती मिळाली होती. याची खात्री झाल्यावर कोल्हापूर महापालिकेचे आरोग्य आधिकरी डॉ. रमेश जाधव यांच्या टीमने राजारामपुरीतील श्री हॉस्पिटलवर छापा टाकला. याठिकाणी गर्भलिंग निदान मशीन बंद अवस्थेत दाखवून त्याद्वारे गर्भलिंग निदान चाचण्या केल्या जात होत्या. यावेळी आरोग्य विभागाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये गर्भलिंग निदान चाचणीसाठी रोख पंधरा हजार रुपये स्वीकारताना रुग्णालय व्यवस्थापकाला रंगेहाथ पकडलंय. या प्रकाराने कोल्हापुरात खळबळ उडालीय.राजारामपुरीतील पहिल्या गल्लीत असणारं श्री हॉस्पिटल हे डॉ. सोनल वालावलकर यांच्या मालकीचं आहे.