नांगनूरच्या साळुबाई पाटील यांची कृतज्ञता – साळुबाईंच्या दोन्ही पायावर झाली मुंबईत शस्त्रक्रिया
कागल: वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ आणि रुग्णसेवा यांचे नातेच निरंतर आहे. परंतु; गंभीर आजारातून खडखडीत बरे झालेल्या रुग्णांने आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय उपकरणे भेट म्हणून दिली. नांगनूर ता. गडहिंग्लज येथील श्रीमती साळुबाई बाबुराव पाटील ( वय- ७० ) यांच्या कृतज्ञतेने मंत्री मुश्रीफही गहिवरले.
याबाबत अधिक माहिती अशी, श्रीमती साळूबाई बाबूराव पाटील रा. नागनूर ता. गडहिंग्लज यांच्या दोन्हीही पायांना त्रास होत होता. त्यांच्यावर मुंबईत सैफी हॉस्पिटलमध्ये गुडघे रोपणाची मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार करून सुखरूप घरी आणल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांचा नातू कु. स्वप्निल सुभाष पाटील यांने आज कागल येथील निवासस्थानी श्री. मुश्रीफ यांना ब्लड प्रेशर, शुगर तपासणी, हृदयाची ठोके चेक करणारे मशीन देवून कृतज्ञपूर्व आभार व्यक्त केले. यावेळी विशाल मोकाशे हेही उपस्थित होते.
“आत्ता आजी चालत जाते…..!”
याबाबत कु. स्वप्निल पाटील म्हणाले, दोन्हीही गुडघ्यांच्या त्रासामुळे आजी श्रीमती साळूबाई बाबुराव पाटील घरीच बसून असायच्या. गुडघ्यांमध्ये वेदना होतात म्हणून औषधे खाऊन- खाऊन त्या कंटाळल्या होत्या. तीन महिन्यापूर्वी मुंबईच्या सैफी हॉस्पिटलमध्ये एक रुपयाही न देता मोफत शस्त्रक्रिया झाल्या. आत्ता आजी किमान अर्धा किलोमीटर चालून- फिरून येते आणि खडखडीत झाली आहे.