एस१ प्रो, एस१एअर आणि एस१एक्स प्लस आता अनुक्रमे रु. १२९,९९९ रु. १०४,९९९ आणि रु. ८४,९९९ मध्ये उपलब्ध.
कोल्हापूर, : भारतातील विद्युतीकरणाच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी आणि ईव्हीच्या स्वीकार करण्याबाबतचे सर्व अडथळे दूर करण्यासाठी भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने तिच्या एस१ स्कूटरच्या पोर्टफोलिओच्या किमती रु.२५,००० पर्यंत कमी केल्या आहेत. मजबूत व्हर्टिकली इंटिग्रेटेड इन-हाउस तंत्रज्ञान, उत्पादन क्षमता आणि उत्पादन प्रोत्साहनासाठीची पात्रता यांच्यावर आधारित खर्चाच्या योग्य पुनर्नियोजनाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हे पाऊल उचलले असल्याचे जाहीर केले आहे.
भक्कम आणि आकर्षक किंमतीच्या उत्पादन पोर्टफोलिओसह ओला एस१ स्कूटर्स कोणत्याही पारंपारिक आयसी इ वाहनांना मागे टाकतात, ज्यामुळे प्रतिवर्षी रु. ३०,०००च्या बचतीसह स्कूटर मार्केटमध्ये ओला एस ची निवड सर्वोत्तम ठरते.या किंमती फक्त फेब्रुवारी महिन्यासाठी वैध आहेत.
एस१ पोर्टफोलिओच्या १६ फेब्रुवारी २०२४ पासून प्रभावीपणे लागू होणाऱ्या सुधारित किमती खालीलप्रमाणे आहेत: एस१ प्रो : रुपये १,२९,९९९ , एस१एअर: रुपये १,०४,९९९ , एस१एक्स(४केडब्ल्यूएच): रुपये १,०९,९९९ , एस१एक्स प्लस (३केडब्ल्यूएच): रुपये ८४,९९९, एस१एक्स (३केडब्ल्यूएच): रुपये ८९,९९९ आणि एस१एक्स (२केडब्ल्यूएच) : रुपये ७९,९९९
अलीकडेच, ओला इलेक्ट्रिकला प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) )योजनेअंतर्गत ऑटोमोबाईल आणि ऑटो कंपोनंट उद्योगातील डोमेस्टिक व्हॅल्यू ॲडिशन (डीएवी) प्रमाणपत्र प्राप्त करणारी पहिली भारतीय २डब्ल्यू कंपनी म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. हे पीएलआय प्रमाणन कंपनीच्या व्हर्टिकली इंटिग्रेटेड उत्पादन क्षमता, मजबूत स्थानिक पुरवठा साखळी इकोसिस्टमचा दाखला देते. शासनाच्या सबसिडीमुळे कंपनीला खर्चाचे पुनर्नियोजन करण्यात मदत झाली आहे आणि त्यामुळे एस१ पोर्टफोलिओमधील स्कूटर्सच्या किमती कमी होऊन त्या अधिक परवडणाऱ्या आणि सुलभ बनल्या आहेत.
ईव्हीचा अवलंब करण्यामधील सर्व अडथळे दूर करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ओला इलेक्ट्रिकने अलीकडेच उत्पादने, सेवा, चार्जिंग नेटवर्क आणि बॅटरी वॉरंटी इत्यादींबाबत अनेक उपक्रमांची घोषणा केली आहे. एस१एक्स (४के डब्ल्यूएच) लाँच करून ओला इलेक्ट्रिकने आपला पोर्टफोलिओ सहा बेस्ट-इन-क्लास उत्पादनांपर्यंत वाढवला आहे. यांमध्ये विविध किंमतींचा समावेश आहे आणि विविध रेंजची गरज असलेल्या ग्राहकांना हे प्रॉडक्ट्स पुरवले जातात.
कंपनीने कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय उत्पादनांच्या संपूर्ण रेंजसाठी इंडस्ट्रीतील पहिली ८ वर्षे/८०,००० किमी विस्तारित बॅटरी वॉरंटी लाँच केली आहे. यामुळे ज्याने वाहनांचे आयुष्य आयसीइ वाहनांच्या आयुर्मानाच्या दुप्पट (२एक्स) होणार आहे. वाढवून इवी दत्तक घेण्यासाठी सर्वात मोठा अडथळा दूर केला आहे. याव्यतिरिक्त, ओला इलेक्ट्रिकने एप्रिल २०२४ पर्यंत तिच्या देशभरातील सध्याच्या ४१४ सेवा केंद्रांची संख्या ६०० केंद्रांपर्यंत वाढवत तिचे सर्व्हिस नेटवर्क ५० टक्क्याने विस्तारित करण्याच्या योजनांचे अनावरण केले आहे.