ए स्क्वेअर ग्रुप निर्मित ‘भुंडीस’ या मराठी चित्रपटाच्या टिझरला मिळालेल्या भव्य प्रतिसादानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा दिमाखात संपन्न झाला.ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.नुकतचं चित्रपटातील ‘कोयतं कुऱ्हाडी’ गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यूट्युबर या गाण्याने धुमाकूळ घातला आहे.
येत्या १७ मे पासुन संपूर्ण महाराष्ट्रतील प्रेक्षकांना जवळच्या चित्रपटगृहात जावून चित्रपट पाहता येणार आहे.
*या चित्रपटात मुख्य भूमिकेत भरत शिंदे , रामभाऊ जगताप ( चांडाळ चौकडी फेम बाळासाहेब , रामभाऊ),यशराज डिंबळे (रौदळ फेम बिट्टू ),
सुरेखा डिंबळे, माणिक काळे, कुमार पाटोळे , अश्विन तांबे , सुभाष मदने, आशुतोष वाडेकर तर याचबरोबर अभिनेते माधव अभ्यंकर, नवनाथ काकडे
मेघराज राजेभोसले हे सुद्धा वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत
‘भुंडीस’हा चित्रपट फक्त करमणुकीसाठी नसून या सिनेमातील अनेक प्रसंग आपल्या जीवनाशी निगडीत आहेत आसे वाटत राहते , त्यात उपस्थित केलेले प्रश्न नक्कीच प्रत्येकाला स्वत:चे वाटतील. चित्रपटाचे कथानक हे तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल.या चित्रपटामध्ये एका कुटुंबाचा सत्यासाठी व त्यांच्या मुलासाठीचा संघर्ष दाखविण्यात आला आहे.चित्रपटाची मांडणी विनोदी पद्धतीने केली असली तरी हा चित्रपट आपल्याला वेगळ्या वातावरणात घेवून जातो. चित्रपटामध्ये आपण जे क्षण पाहतो त्या प्रत्येक क्षणाशी प्रेक्षक जोडला जाईल.या कथेद्वारे सामान्यातून असमान्य व्यक्ती कशी तयार होते आणि प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे समजून येते.ही कथा प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल.या चित्रपटाची कथा ही प्रेरणादायी असून हा एक कौटुंबिक संघर्ष आहे.सर्व कलाकारांनी मिळून हा संघर्ष सुखावह केला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक प्रेरणा आणि उर्जेचा स्त्रोत घेवून बाहेर पडतील याबाबत दुमत नाही. संगीत व सर्व गाणी उत्तम जमुन आली आहेत.
चित्रपटाचे निर्माते दत्ता बापुराव दळवी असून दिग्दर्शक वैभव राजेंद्र सुपेकर हे आहेत.चित्रपटाचे लेखन गीत संगीत सोमनाथ संभाजी तांबे यांनी केले असून गायक म्हणून आदर्श शिंदे, नंदेश उमप, राखी चौरे, निधी हेगडे हे लाभले आहेत.चित्रपटातील नृत्य दिग्दर्शन सागर रोकडे, आरती गुप्ता यांनी केले आहे. चित्रपटाचे छायांकन भास्कर ठोकळ यांचे असून कलादिग्दर्शन सुभाष भनभने, सचिन इचके, ऋषि मखर यांचे आहे.तर कार्यकारी निर्माते संदीप काकडे आहेत तर निर्मिती प्रमुख म्हणून प्रशांत बोगम हे काम पाहत आहेत .