वृद्धांच्या मागणीनंतर अवघ्या दीड तासात केली पूर्तता
कागल, दि. १३:आज शनिवार दि 13 जुलै 2024 रोजी सकाळी आठ वाजताची ही वेळ. ठिकाण अर्थातच कागल शहरातील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान. पावसाळी अधिवेशनानिमित्त गेले पाच-सहा दिवस मुंबईत असलेले मंत्री श्री. मुश्रीफ नुकतेच पोहोचले होते. साधारणता 85 वर्षांचे व्हन्नूर गावाचे आण्णाप्पा सत्याप्पा माने हे एक वयोवृद्ध आजोबा मंत्री श्री मुश्रीफ यांच्या घरासमोर आले. कार्यकर्त्यांनी आणि श्री. मुश्रीफ यांचे स्वीय सहाय्यक मुन्ना शहाणी दिवाण यांनी त्यांना काय काम आहे? असे विचारले. त्यांनी थेट साहेबांनाच भेटायचं आहे, असं सांगितलं. त्यानुसार उपस्थित ४०० ते ५०० जणांच्या गर्दीतून वाट काढीत त्यांनी त्यांना मंत्री श्री. मुश्रीफ यांना प्राधान्याने भेटवलेही.
मंत्री श्री. मुश्रीफ त्यांना म्हणाले, बोला तुमची काय अडचण आहे? आजोबांनी उत्तर दिले की, वयोमानामुळे ऐकू कमी येतयं. त्यामुळे कानाचे मशीन पाहिजे. तेवढ्यातच गर्दीतच उभारलेल्या करनूरच्या नानाबाई सदाशिव चव्हाण यांची मही मागणी तीच होती. श्री. मुश्रीफ त्यांना सांगत होते, उद्या किंवा परवा तुम्हा दोघांच्याही घरी मशीन पाठवून देतो. परंतु ते काही ऐकतच नव्हते. वयोवृद्ध म्हाताऱ्या लोकांचा अट्टाहास हा बालहट्टच असतो या भावनेतूनच मंत्री श्री. मुश्रीफ त्यांचे ऐकत होते.
श्री. मुश्रीफ यांनी तातडीने स्वीय सहाय्यकाला दोन श्रवणयंत्रे उपलब्ध करण्यास सांगितले. त्यांनीही लगबगिने दोन श्रवणयंत्रे कोल्हापूरहून सव्वा ते दीड तासाच्या आत त्या आजी-आजोबांची मागणी पूर्ण केली. त्यानंतर वयोवृद्ध आजोबा श्री. माने यांचे शब्द मात्र लक्षात राहण्यासारखे आहेत. श्रवणयंत्र मशीन घेऊन जाता- जाताच ते बोलले, ‘गोरगरिबांचं “ऐकून” घ्यावं ते माझ्या मुश्रीपसायबानच…….!’.