कोल्हापूर : कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योगपती विख्यात गिर्यारोहक हेमंत शहा, बांधकाम व्यावसायिक मदन भंडारी व प्रताप कोंडेकर आणि गुजरात मधील रीशी पावर सिस्टीम या कंपनीतील उच्च पदस्थ अधिकारी सुधीर बोरा या चार मित्रांनी १५ एप्रिल ते २२ जून असा ७० दिवसांचा कोल्हापूर ते लंडन या रोड ट्रीपचा आगळा आणि पहिला बहुमान मिळवला. प्रत्यक्षात ही कल्पना सुचने आणि ती प्रत्यक्ष अंमलात आणणे ही बाब फारच कठीण आहे.मात्र हे धाडस कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप उर्फ बापू कोंडेकर यांनी केले.
१५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता शिवाजी विद्यापीठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून या अनोख्या प्रवासास सुरुवात करण्यात आली होती.
“पर्यावरणाचे रक्षण करा , पाणी वाचवा निसर्ग वाचवा” असा संदेश देण्यासाठी त्यांनी मायनस ९ डिग्री आणि प्लस ४३ डिग्री तापमानाचा सामना करत हा कठीण आणि अवघड असा कोल्हापूर ते लंडन जवळपास २० देशांत ७० दिवसांचा व २० हजार किलोमीटरचा थरारक, अनोखा असा प्रवास चक्क सेव्ह वॉटर सेव्ह नेचर..या ‘कोल्हापूर ते लंडन’ जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी देऊन कोल्हापूरचे नाव लंडनच्या हृदयावर कोरले आहे .
आपल्या स्वतःच्या वाहनाने हा प्रवास करून कोल्हापूरच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. शिवाय वीस देशांना भेटी देत लंडनच्या भूमीवर भारत देशाचा तिरंगा फडकवला आणि कोल्हापूरचे नाव लंडनच्या हृदयावर कोरण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे.
आपल्या तब्बल १९ हजार किलोमीटरच्या या प्रवासा दरम्यान यांनी नेपाळ , उजबेकीस्थान, क्रिकीस्थान तुर्कस्तान,रशिया, जॉर्जिया, बल्गेरिया, सर्बिया, हंगेरी, झेक रिपब्लिक, बेल्जियम, युनायटेड किंगडम,ग्रीस अशा सह २० देशांचा प्रवास केला .
अनेक तंत्र प्रणालीच्या माध्यमातून खर्चाचे पाणी सुद्धा पिण्या योग्य बनवता येते हा जलमंत्रदेखील या मंडळींनी प्रत्येक देशाच्या मातीत रुजवला. भारतीय संस्कृती आणि नीती मूल्ये अन्य देशात रुजविणे आणि अन्य देशातील चांगल्या गोष्टी, परराष्ट्राच्या विधायक संस्कृतीं आपल्या भारत देशात रुजविणे या देवाण-घेवाणीच्या उदात्त उद्देशाने कोल्हापूर लंडन रोड ट्रीपचे आयोजन केले होते.
प्रताप कोंडेकर , उद्योगपती .
अलीकडे ग्लोबल वॉर्मिगचा परिणाम होत चालला आहे.पाण्याची कमतरता, शेती करण्याची पद्धत अवगत करणे आवश्यक आहे,त्याचा मानवावर होणारा परिणाम यासाठी सर्वांनी मिळून काम करणे आवश्यक आहे. या सर्वाचा अभ्यास आणि विविध देशाची संस्कृती याची देवाण घेवाण करण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करा,पाणी वाचवा निसर्ग वाचवा असा संदेश देण्यासाठी आम्ही हा प्रवास केला .
हेमंत शहा . उद्योगपती
या ७० दिवसांच्या प्रवासात आम्हाला त्या त्या ठिकाणचे गाईड यांनी दिशा दिली. यानुसार आम्ही सर्व देश पाहिले.या सर्वाची तयारी जाण्याआधी सहा महिने केली गेली.सर्व देशांचा अभ्यास माहिती संकलित करूनच आम्ही पुढे जाण्याचा निश्चय केला आणि हा दौरा यशस्वी केला .
मदन भंडारी, बांधकाम व्यवसायीक .