कोल्हापूर : स्कोडा ऑटोने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आटोपशीर एसयूव्हीची घोषणा करून आपला ब्रँड भारतात वाढवण्याच्या महत्त्वाकांक्षा स्पष्ट केल्या होत्या. राष्ट्रीय स्तरावरील नामकरण मोहिमेमधून कायलॅकला आपले नाव मिळाले असून तिचे उद्घाटन जगभरात ६ नोव्हेंबर २०२४ रोजी केले जाईल. कायलॅकसह स्कोडा ऑटो इंडिया कोडिएक आणि स्कोडा ऑटो इंडिया २.० च्या प्रकल्पातील पहिले अनावरण असलेली मध्यम आकाराची एसयूव्ही कुशाक यांच्यासह आपल्या लक्झरी एसयूव्ही बाजारात आणणार आहे. कायलॅकमुळे स्कोडा ऑटो सब ४ एम विभागात उपलब्ध होईल. ही भारतातील एकूण कारच्या बाजारपेठेपैकी ३० टक्के बाजारपेठ असेल आणि भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या विभागांपैकी एक आहे. कायलॅक आपल्या आधुनिक, बोल्ड आणि मस्क्युलर स्टायलिंग, सिद्ध झालेले स्कोडा ड्रायव्हिंग डायनॅमिक्स, अद्वितीय सुरक्षा आणि विविध प्रकारच्या वैशिष्ट्यांसह आटोपशीर एसयूव्ही विभागाला एक वेगळे रूप देण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे ती लोकांना नक्कीच आकर्षित करेल. कायलॅकच्या अनावरणामुळे स्कोडा ऑटो भारतात न्यू एरा मध्ये प्रवेश करेल. युरोपबाहेर ही ब्रँडसाठीची सर्वांत महत्त्वाची बाजारपेठ आहे.
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पियूष अरोरा म्हणाले की, स्कोडा इंडियाकडून पहिली आटोपशीर एसयूव्ही कायलॅक आणताना मला खूप अभिमान वाटतो आहे. कायलॅकची रचना उच्च दर्जाच्या स्थानिकीकरणासह केली गेली असून आमच्या मेक इन इंडिया वचनबद्धतेला शक्ती देण्यात आली आहे. ही गाडी ग्रुपच्या डायनॅमिक, सुरक्षा आणि आराम या गोष्टींना चालना देण्याच्या डीएनएचे प्रतिनिधीत्व करते आणि त्यासोबत आमच्या किमतीबाबत जागरूक ग्राहकांना हवी असलेली प्रात्यक्षिक वैशिष्टेही त्यात आहेत. मला खात्री आहे की, हे उत्पादन भारतीय ग्राहकांच्या विचारसरणीशी जुळणारे असेल. कायलॅकचे डिझाइन आणि निर्मिती भारतात, भारतासाठी करण्यात आली असून त्यातून ही बाजारपेठ नक्कीच बदलेल.
कायलॅकला सिद्ध आणि कार्यक्षम १.० टीएसआय इंजिनाने ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे सिक्स स्पीड मॅन्युअल किंवा सिक्स स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसाठी ती सज्ज आहे. या इंजिनातून ८५ किलोवॉट ऊर्जा आणि १७८ एनएम टॉर्क निर्मिती केली जाते. ही कार कुशाक आणि स्लाव्हिया या दोन कारप्रमाणेच एमक्यूबी-एओ-इन प्लॅटफॉर्मवरच तयार करण्यात आली आहे. या दोन कार्सनी प्रौढ आणि मुलांसाठी ग्लोबल एनसीएपी चाचणीत ५ स्टार मिळवले आहेत. कायलॅकमध्ये २५ पेक्षा जास्त कार्यरत आणि छुप्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे. त्यात सहा एअरबॅग्स, ट्रॅक्शन आणि स्थैर्य नियंत्रण, अँटी लॉक ब्रेक्स, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन, ब्रेक डिस्क वायपिंग, रोल ओव्हर प्रोटेक्शन, मोटर स्लिप रेग्युलेशन, इलेक्ट्रॉनिक डिफरंशियल लॉक, पॅसेंजर एअरबॅग डी-एक्टिव्हेशन, मल्टी कॉलिजन ब्रेकिंग आणि आयसोफिक्स सीट्स अशा विविध वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
कायलॅक चालक आणि प्रवाशांना भरपूर जागा व आराम देखील देईल. कायलॅक व्हेंटिलेशन फंक्शनसह वर्गातील प्रथम एडजस्टेबल ड्रायव्हर आणि पॅसेंजर सीट्स देईल. कायलॅक भारतात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या आणि सर्वधिक स्पर्धात्मक बाजारपेठेत स्कोडा ऑटोच्या अस्तित्वाचे नेतृत्व करेल.