कागल, :रक्त आटवून काबाडकष्ट करणारे कामगार या समाजाचे खरे शिल्पकार आहेत. कामगार मंत्री असताना आपण बांधकाम कामगारांसाठी कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांचे कोटकल्याण झाले . या कामगार कल्याण योजनेतून बांधकाम कामगारांनी मुला बाळांना शिकवून आपले संसार सुखी करावेत, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.
कागलमध्ये आयोजित कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. बांधकाम कामगारांना गृहपयोगी भांडी संचाचे वितरण झाले.
भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, येत्या काळात विविध मंडळे स्थापन करून महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या साडेचार कोटी कामगारांच्या जीवनमानात बदल घडवून आणण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. साडेचार कोटींपैकी काहीच नोंदीत कामगार आहेत. उर्वरीत शेत कामगार, कापड उद्योग कामगार, हॉटेल व्यवसायातील कामगार, ट्रक चालक, रिक्षा चालक तसेच इतर मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्यांसाठी मंडळे स्थापन करून त्यांचेही जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करता येईल.
ते म्हणाले, हे शासन सर्व घटकांसाठी काम करत आहे . शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांनी जास्तीत जास्त घ्यावा. रक्षाबंधन पूर्वी महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा करणार आहोत .
बहिणींनो, भावाला साथ द्या……!
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ हे गोरगरीब,कष्टकरी लोकांसाठी आहोरात्र झटणारे नेते आहेत . महिलांच्यासाठी अनेक योजना त्यांनी सुरू केल्या . अनेक ऑपरेशन मोफत करून आणली आहेत . आपली जीवापाड काळजी करणाऱ्या हसन मुश्रीफ भावाला येत्या विधानसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी माता – भगिनींनी त्यांच्या मागे उभे रहावे.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके, माजी नगराध्यक्ष नवल बोते, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, माजी नगराध्यक्ष अस्लम मुजावर, , सौरभ पाटील, शहराध्यक्ष संजय चितारी, ईरफान मुजावर, शशिकांत नाईक, बाबासो पखाली, नवाज मुश्रीफ, सज्जाद मुजावर, अशोक वड्ड, चंद्रशेखर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वागत माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांनी केले. प्रास्ताविक केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले.