कोल्हापूर: स्कोडा ऑटो इंडिया जागतिक स्तरावर १२९वा वर्धापन दिन आणि भारतात २४वा वर्धापन दिन साजरा करण्याच्या टप्प्यावर आहे. वर्षभरात अनेक ग्राहक व उत्पादन उपक्रम राबवण्यासोबत २०२४ च्या सुरूवातीला ऑल-न्यू कॉम्पॅक्ट एसयूव्हीची घोषणा केल्यानंतर स्कोडा ऑटो इंडियाने या ऑल-न्यू कारची दुसरी झलक सादर केली.
डिझाइन टीझरच्या रीलीजबाबत मत व्यक्त करत स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा म्हणाले, ”आम्ही २०२४ च्या सुरूवातीला आमच्या ऑल-न्यू कॉम्पॅक्ट एसयूव्हीची घोषणा केली. २०२४ च्या मध्यादरम्यान आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहोत. भारतातील रस्त्यांवर आमच्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची प्रखर चाचणी घेतली जात आहे आणि आम्ही आमच्या उत्पादन तयारी, उच्च क्षमता आणि दर्जात्मक स्थानिक पुरवठादार सहयोगींसोबत सहयोगाने बारकाव्यांमध्ये सुधारणा करत आहोत. नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही निश्चितच भारतातील रस्त्यांवर आमच्या युरोपियन तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करेल. सर्वात मोठ्या कार प्लॅटफॉर्मवर आधारित असलेल्या आमच्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या सुसंगत फूटप्रिंटमध्ये ‘बिग कार’चा अनुभव मिळेल, ज्यामुळे युरोपबाहेर स्कोडा ऑटोसाठी सर्वात महत्त्वपूर्ण बाजारपेठ भारताप्रती आमच्या ब्रँड कटिबद्धतेशी संलग्न राहत नवीन कार ग्राहकांचे अधिक लक्ष वेधले जाईल. युरोपबाहेर उत्पादित केल्या जाणाऱ्या बहुतांश स्कोडा कार्स आमच्या स्थानिक फॅक्टरीजमध्ये निर्माण केल्या जातात आणि आम्ही स्थानिक पातळीवर उत्पादित केलेल्या कार्स १४ देशांमध्ये निर्यात करत आहोत.
ऑल-न्यू कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतातील सब ४-मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये स्पर्धा करेल. या सेगेमेंटमध्ये ब्रँडने पहिल्यांदाच प्रवेश केला आहे आणि नवीन ग्राहकांसाठी या ऑल-न्यू वेईकल सादर करण्याकरिता कंपनीचे पूर्णत: नवीन बाजारपेठांवर लक्ष्य आहे. एसयूव्ही कुशक व स्लाव्हिया प्रमाणे एमक्यूबी-एओ-इन प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. भारतातील व झेक रिपब्लिकमधील टीम्सनी विशेषत: भारतासाठी एमक्यूबी-एओ-इन प्लॅटफॉर्म विकसित केले. कुशक व स्लाव्हिया या दोन्ही कार्सना ग्लोबल एनसीएपीच्या सुरक्षितता चाचण्याअंतर्गत प्रौढ व्यक्ती आणि मुलांसाठी संपूर्ण ५-स्टार मिळाले आणि १४ देशांमध्ये या कार्स निर्यात केल्या जात आहेत.
फेब्रुवारी २०२४ मध्ये या ऑल-न्यू कारसाठी घोषणा करण्यात आली आणि २०२५ मध्ये भारतात जागतिक पदार्पण करणार आहे. ही पेट्रोल-पॉवर्ड ऑल-न्यू कॉम्पॅक्ट एसयूव्ही, कुशक एसयूव्ही, स्लाव्हिया सेदान, कोडियक लक्झरी ४X४, सुपर्ब लक्झरी सेदान आणि कस्टमर टचपॉइण्ट्समधील अधिक विस्तारीकरणासह स्कोडा ऑटो इंडियाने भारतात आपल्या अधिक विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.