कोल्हापूर : वॉर्डविझार्ड फूड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेड ही खाद्यपदार्थ आणि पेय क्षेत्रातील आघाडीची कंपनी निर्यातीवर जास्त भर देणार असून, त्यासाठी कंपनीने आपल्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय धोरणात लक्षणीय विस्तार करण्याचे ठरविले आहे. कंपनीला सातत्याने जगभरातून ऑर्डर्स मिळत आहेत आणि कंपनीच्या उत्पादनात वाढता रस घेतला जात आहे. यावरून कंपनीचे जागतिक बाजारपेठेतील अस्तित्व विस्तारत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
वॉर्डविझार्ड फूड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडने यूएईसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत प्रवेश केला असून, कंपनी उच्च दर्जाच्या रेडी-टू-इट (आरटीई) उत्पादनांचा पुरवठा करणार आहे. यामुळे मध्यपूर्व बाजारपेठेतील कंपनीची गुणवत्ता आणि विश्वासार्हतेप्रति नव्याने बांधिलकी अधोरेखित होईल. वॉर्डविझार्ड फूड्स अँड बेव्हरेजेसच्या आरईटी उत्पादनांना अमेरिकेत मिळत असलेली मागणी वाढत असून, जेवणाच्या सोईस्कर आणि पटकन तयार होणाऱ्या पर्यायांच्या शोधात असलेल्या अमेरिकी व एनआरआय ग्राहकांची या उत्पादनांना पसंती मिळत आहे.
आरटीई उत्पादनांच्या यशानंतर वॉर्डविझार्ड फूड्स अँड बेव्हरेजेस आता अमेरिकी बाजारपेठेतही फ्रोझन स्नॅक्सची श्रेणी उपलब्ध करून देत आहे. कंपनीने लक्षणीय ऑर्डर्स मिळविल्या असून, त्यावर कंपनीची लोकप्रियता व उत्पादनांवर असलेला विश्वास दिसून येत आहे. वॉर्डविझार्ड फूड्स अँड बेव्हरेजेसने कॅनडामधूनही फ्रोझन स्नॅक्ससाठी मोठी ऑर्डर मिळविली आहे. हा विस्तार वॉर्डविझार्ड फूड्स अँड बेव्हरेजेसच्या वैविध्यपूर्ण उत्पादन श्रेणीला जगभरात मिळत असलेली लोकप्रियता दर्शविणारा आहे.
ब्रँडच्या विकासाविषयी वॉर्डविझार्ड फूड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौ. शीतल भालेराव म्हणाल्या, ‘जागतिक बाजारपेठेतील वाढत्या संधींचा लाभ घेण्यासाठी निर्यातीवर भर देण्याचे धोरणात्मक पाऊल आम्ही उचलले आहे. सातत्याने येत असलेल्या ऑर्डर्स आमच्या उत्पादनांवर असलेला विश्वास आणि त्यांना असलेली मागणी दर्शविणाऱ्या आहेत. आम्ही आमच्या उत्पादन क्षमता उंचाविण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या बदलत्या गरजा पुरविण्यासाठी उत्पादन श्रेणी विस्तारण्यासाठी बांधील आहोत.’
वॉर्डविझार्ड फूड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेड अमर्याद विकासाच्या टप्प्यावर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून सातत्याने मिळत असलेल्या ऑर्डर्स ब्रँडचा दर्जा आणि जागतिक बाजारपेठेसाठी सुसंगत उत्पादने तयार करण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे. या विकासाला चालना देत, वॉर्डविझार्ड फूड्स अँड बेव्हरेजेस आणखी विस्तार आणि नावीन्य देण्यासाठी सज्ज असून, त्याद्वारे जगभरातील ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण चवींच्या मागण्या पूर्ण केल्या जातील. कंपनी जास्त प्रभावी धोरणाच्या मदतीने भारतीय रिटेल बाजारपेठेवरून आपले लक्ष निर्यातीवर जास्त केंद्रित करत आहे.