सांगली, ४ ऑक्टोबर २०२४: जगातील आघाडीच्या आभूषण विक्रेत्यांपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने महाराष्ट्र राज्यातील आक्रमक विस्ताराचा एक भाग म्हणून आज सांगली येथे आपल्या नवीनतम शोरूमचे उद्घाटन खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मलाबार गोल्ड अँड डायमंड्स च्या सांगली शाखेचे प्रमुख आशिष महागावकर, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स चे वेस्ट झोन मार्केटिंग मॅनेजर ऋषिकेश पवार आणि शितल डुबल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. विश्रामबाग येथे असलेले, हे शोरूम मलाबारचे महाराष्ट्रातील २६ वे आणि भारतातील २८० वे विक्री दालन असून, जगभरात १३ देशांमध्ये ३६० हून अधिक शोरूम्सच्या मलाबारच्या वैश्विक उपस्थितीत ते योगदान देते.
माइन डायमंड ज्वेलरी, एरा अनकट डायमंड्स, डिव्हाईन हेरिटेज ज्वेलरी आणि बरेच काही यांसारख्या ब्रॅण्डच्या खास संग्रहणासह या नव्या ४,८०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या शोरूममध्ये सोने, हिरे, पोल्की, रत्न आणि प्लॅटिनम दागिन्यांची विस्तृत श्रेणी निवडीसाठी उपलब्ध असेल.
सांगलीचे प्रतिनिधीत्व करणारे लोकसभेचे खासदार विशाल प्रकाशबापू पाटील यांच्या हस्ते फीत कापून, मलाबार समूहाचे अध्यक्ष एम. पी. अहमद यांच्या दूरचित्र माध्यमांतून उपस्थितीत या नवीन शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी एम पी अहमद म्हणाले की, “सांगलीमध्ये आमचे नवीन विक्री दालन सुरू करून महाराष्ट्रात आमचा ठसा वाढवताना आम्हाला आनंद होत आहे. नवीन दालनाचे हे अनावरण केवळ या प्रदेशातील आमची उपस्थिती मजबूत करत नाही तर जागतिक दर्जाच्या दागिन्यांच्या खरेदीचा अनुभव ग्राहकांच्या व्यापक वर्गाला प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करणारे आहे. आम्ही जनसमुदायाचा एक विश्वासार्ह भाग बनण्यासाठी आणि आमच्या ग्राहकांशी कायमस्वरूपी संबंध निर्माण करण्यास उत्सुक आहोत.”
विविध २६ देशांमधील जवळपास २२,००० बहुभाषी कर्मचाऱ्यांच्या संघाच्या पाठिंब्याने, मलाबार १०० शहरांमध्ये दीड कोटी ग्राहकांना सेवा देते. त्याच्या वन इंडिया वन गोल्ड रेट उपक्रमाचा एक भाग म्हणून, मलाबार सर्व भारतीय विक्री दालनांमध्ये एकसमान किंमत प्रस्तुत करून, पारदर्शकता आणि निष्पक्षतेची ग्राहकांना ठोस हमी देते.
नेहमीप्रमाणेच मलाबारने, पारदर्शक किंमत, आजीवन मोफत देखभाल, जुन्या सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी १०० टक्के पुनर्खरेदी (बायबॅक) मूल्य, प्रमाणित दर्जाचे हिरे, एचयूआयडी-अनुरूप सोने, आणि ग्राहकांचे पूर्ण समाधान सुनिश्चित करून दागिन्यांचा मोफत विमा अशी आपली मलाबार आश्वासने नवीन दालनांत येणाऱ्या ग्राहकांसाठी कायम ठेवली आहेत.
मलाबार त्याच्या सीएसआर आणि ईएसजी उपक्रमांसाठी वचनबद्ध आहे, त्याच्या नफ्यांपैकी ५ टक्के आरोग्यसेवा, शिक्षण, गृहनिर्माण आणि पर्यावरणीय टिकाऊपणा या कारणांसाठी नित्यनेमाने खर्च करते. सामाजिक उत्तरदायित्वावरील हे लक्ष ब्रॅण्डचे नैतिक व्यवसाय पद्धती आणि शाश्वत वाढीसाठीचे समर्पण प्रतिबिंबित करते