• महाराष्ट्रातील अल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजांच्या वाढत्या बाजारपेठेत ५ टक्के हिस्सा मिळविण्याचे उद्दिष्ट
• कोल्हापूर, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि विदर्भात कामकाजाचा विस्तार
कोल्हापूर:अपर्णा एंटरप्रायझेस लिमिटेड (एईएल) या भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या आणि बांधकाम साहित्याचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने दर्जेदार अल्युमिनियमपासून बनविलेल्या खिडक्या व दरवाजांचा ब्रँड – अल्टेझाचा कोल्हापूरमध्ये विस्तार करत असल्याचे जाहीर केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला पुण्यात झालेल्या यशस्वी लाँचनंतर कंपनी राज्यातील इतर शहरांमध्ये व्याप्ती वाढवत असून, त्यात नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि विदर्भाचा समावेश आहे. अल्टेझाची उच्च कामगिरी करणारी ऊर्जा कार्यक्षम उत्पादने या टिकाऊ व उठावदार आधुनिक बांधकाम साहित्याच्या वाढत्या गरजा पूर्ण करणारी आहेत.
महाराष्ट्रातील अल्युमिनियमच्या खिडक्या आणि दरवाजांची बाजारपेठ ६०० कोटी रुपयांची असून, नॅशनल कंपाउंड अॅन्युअल ग्रोथ रेट (सीएजीआर) २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कोल्हापूर शहर निवासी आणि व्यावसायिक विकासासाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत असून, त्यामुळे उच्चभ्रू इमारतींसाठी लक्षणीय संधी मिळणार आहे. ब्रँडने पहिल्याच वर्षात महाराष्ट्रात लक्षणीय बाजारपेठ मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या दरम्यान, कंपनी आपली अत्याधुनिक उत्पादने आणि लक्षणीय प्रकल्प व्यवस्थापन धोरणाचा वापर करून दमदार परिणाम साधणार आहे. कंपनीने यापूर्वीच शहरातील वितरकाशी भागीदारी केली असून, त्याद्वारे प्रकल्पाची सफाईदार अंमलबजावणीची खात्री होईल, तसेच ग्राहकांना असामान्य सेवेचा अनुभव मिळेल.
अपर्णा एंटरप्रायझेसच्या कार्यकारी संचालक श्रीमती अपर्णा रेड्डी विस्ताराविषयी म्हणाल्या, ‘भारताच्या पश्चिम भागातील स्थावर मालमत्ता आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी वाढ झाली असून, त्यामुळे टिकाऊ व उच्च दर्जाच्या उत्पादनांची मागणी वाढली आहे. अल्टेझा या आमच्या प्रीमियम ब्रँडच्या माध्यमातून अल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजांच्या बाजारपेठेत वेगाने वाढत असलेल्या क्षेत्रातील संधींचा लाभ घेण्यासाठी व ग्राहकांना दर्जेदार सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. महाराष्ट्रातील विस्तार आमच्यासाठी लक्षणीय असून, त्यामुळे राज्यात, तसेच पश्चिम भागात आमच्यासाठी मुबलक संधी खुल्या होत आहेत.’
अल्टेझाचे प्रमुख श्री. अमर देशपांडे म्हणाले, ‘भारतीय जिल्ह्यांपैकी कोल्हापूरचा मानवी विकास निर्देशांक सर्वोच्च पातळीवर असलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे. कोल्हापूर जिल्ह्याने गेल्या काही वर्षांत आर्थिक विकासाच्या बाबतीत अनेक शहरांना मागे टाकले आहे. आम्हाला जाहीर करण्यास आनंद होतो की, महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीतील आमचे पहिले वितरक मिळाले आहेत. ग्राहकांना आमच्या अत्याधुनिक शोरूममध्ये असामान्य अनुभव मिळेल आणि आमच्या यंत्रणा जवळून पाहिल्याने व अनुभवल्याने कदाचित त्यांची खरेदीची प्रक्रिया जास्त सोपी होईल.’
भारतातील अल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजांच्या मागणीला प्रामुख्याने बांधकाम व रियल इस्टेट क्षेत्रामुळे चालना मिळत असून, या क्षेत्रांत ऊर्जा कार्यक्षम आणि उठावदार उत्पादनांना महत्त्व येत आहे. सरकारी उपक्रमांद्वारे परवडणारी घरे व शहरी विकासावर भर असल्यामुळे ही मागणी आणखी वाढली आहे. २०१९ मध्ये अपर्णा एंटप्रायझेस लि.चा विभाग म्हणून अल्टेझाची स्थापन करण्यात आली. अल्टेझाने दक्षिण भारतातील प्रमुख शहरांमध्ये, तसेच पश्चिम आणि मध्य भारतातील निवडक शहरांत वेगाने आपले अस्तित्व विस्तारले आहे. कंपनी आता महाराष्ट्रातील अल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजांच्या बाजारपेठेत आघाडीचे स्थान मिळविण्यास सज्ज आहे.