बेनेली| कीवे| मोटो वॉल्ट इंडियाने कर्नाटकात बेळगावी येथे नवी डीलरशीप सुरू केली आहे. मत्तीकोप बिल्डिंग, ९७६, एस पी ऑफिस रोड, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर, कोल्हापूर सर्कलजवळ, अयोध्या नगर, सदाशिव नगर, बेळगावी, कर्नाटक ५९००१६ येथे हे नवे स्टोअर आहे. या नव्या अत्याधुनिक स्टोअरमध्ये कर्नाटकात बेळगावी आणि आसपासच्या बेनेली। कीवे। मोटो वॉल्ट चालकांसाठी विक्री, सेवा आणि स्पेअर अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
बी एफ मत्तीकोप मोर्टस या बॅनरअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या केंद्राचे व्यवस्थापन श्री. आदर्श मत्तीकोप, डीलर प्रिन्सिपल, बेनेली। कीवे। मोटो वॉल्ट- बेळगावी, कर्नाटक यांच्यातर्फे केले जाणार आहे. या नव्या केंद्रासह बेनेली| कीवे| मोटो वॉल्ट इंडियाने भारतभरात ६० हून अधिक संपर्ककेंद्रांसह दमदार अस्तित्व निर्माण केले आहे. या नव्या केंद्रात बेनेलीच्या सुपरबाइक्सची संपूर्ण रेंज तसेच नुकत्याच सादर झालेल्या हंगेरीतील खास कीवेची उत्पादने उपलब्ध आहेत. शिवाय, या शोरूममध्ये अस्सल मर्कंडाइज आणि विविध प्रकारच्या अॅक्सेसरीजही उपलब्ध असतील.
उद्घाटनप्रसंगी बेनेली।कीवे। मोटो वॉल्ट-बेळगावी-कर्नाटकचे डीलर प्रिन्सिपल श्री. आदर्श मत्तीकोप म्हणाले, “बेनेली। कीवे। मोटो वॉल्ट इंडियासोबत भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद वाटतो. ग्राहकांना प्राधान्य देणाच्या आमच्या मूळ तत्वासह आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना विक्री आणि सेवा यात उत्कृष्ट अनुभव देऊ. बेनेली।कीवे। मोटो वॉल्ट-बेळगावी-कर्नाटकमध्ये ग्राहकांना उत्तम अनुभव देता यावा यासाठी आमच्या टीमला कंपनीतर्फे जागतिक मानांकनानुसार प्रशिक्षण देण्यात आले आहे.”
बेनेली। कीवे। मोटो वॉल्ट-इंडिया यांच्यातर्फे एकत्रितरित्या अत्यंत रोमांचक उत्पादने उपलब्ध आहेत. तसेच भारतभरातील दमदार, उत्साही मोटरिंगप्रेमींना कोणत्याही त्रासाशिवाय वाहन वापरण्याचा अनुभव मिळावा, यासाठी प्रयत्न केले जातात.