मधुगंधा कुलकर्णी, निपुण धर्माधिकारी यांचे लेखन व दिग्दर्शन आणि स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर यांचा अभिनय असलेल्या“लग्नपंचमी”ला प्रचंड प्रतिसाद

महाराष्ट्र : मराठी रंगभूमीवरची सर्जनशील, बहुमुखी कलावंत मधुगंधा कुलकर्णी आणि निपुण धर्माधिकारी यांचे अनुक्रमे लेखन-दिग्दर्शन आणि स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर यांच्या भूमिका असलेल्या ‘लग्नपंचमी’ला महाराष्ट्रात भरभरून प्रतिसाद मिळाला आणि दोन महिन्यात त्याचे २५ प्रयोग झालेसुद्धा. या रजतमहोत्सवी प्रयोगाच्या निमित्त्ताने मराठी भाषा गौरव दिनी या नाटकाच्या निर्मात्यांनी नाटकाचा ‘वर्ल्ड टूर’ अर्थात परदेश दौरा जाहीर केला असून तो अशाप्रकारचा मराठी नाटकाचा पहिलाच परदेश दौरा असणार आहे.
या दौऱ्याविषयीचा आणखी तपशील लवकरच जाहीर होणार असून, या घोषणेनंतर नाटकाबद्दल जगभरातील मराठी रसिकांमध्ये औस्तुक्य लागून राहिले आहे.फ्लिक्स प्ले एंटरटेन्मेंट या निर्मिती संस्थेचे यतीन पाटील यां निर्मात्या कंपनीचे यतीन पाटील यांनी या नाटकाच्या आजच्या पंचविसाव्या प्रयोगाच्यावेळी ही घोषणा केली. या नाटकाचा पंचविसावा प्रयोग मराठी भाषा गौरव दिनी रवींद्र नाट्य मंदिर येथे हाउस फुल गर्दीत झाला.
या परदेश दौऱ्यात ‘लग्नपंचमी’चे प्रयोग अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया- आणि-न्यूझीलंड, आशिया खंडातील देश, मध्यपूर्व देश तसेच युरोपसह युनायटेड किंग्डम येथे आयोजित करण्यात येणार आहेत. मराठी नाटकाच्या इतिहासात इतक्या व्यापक स्तरावर विविध खंडांमध्ये एकत्रित दौऱ्याची घोषणा होणे ही अभिमानाची बाब मानली जात असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली.
परदेश दौऱ्याची घोषणा करताना, यतीन पाटील म्हणाले की, अशाप्रकारचा मराठी नाटकाचा हा पहिला दौरा असणार आहे. “बॉलीवूडच्या कार्यक्रमांचा दौरा होतो तेव्हा जगभरात होणाऱ्या सर्व शोंची घोषणा एकत्र होते. मराठी नाटकांच्या किंवा कार्यक्रमांच्या बाबतीत तसे होत नाही. जगभरातील प्रयोग एकाच
वेळी जाहीर होत नाहीत.‘लग्नपंचमी’च्या बाबतीत आम्ही ते करणार आहोत ,” असे यतीन पाटील म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “माझे स्ट्रॅटेजी पार्टनर “दि आयडियाज” त्यांचेही त्यासाठी खूप खूप आभार. तुम्हा रसिकांचा प्रतिसाद मुंबई आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मिळाला. तसाच तो परदेशांमधील प्रयोगांनाही मिळेल याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे. परदेशातील प्रयोगांची आम्ही आतुरतेने वाट पहात आहोत. तुम्हीही पुढील घोषणेची वाट पहा. ‘लग्नपंचमी’च्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील मिक्सबॉक्स इंटरटेन्मेंट या पेजला भेट द्यायला विसरू नका.”
या नाटकाचा निर्माता आणि मध्यवर्ती भूमिकेतील कलाकार स्वप्नील जोशी म्हणाले की निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांच्यासाठी आजचा क्षण अत्यंत मोलाचा आहे. “मराठी भाषा गौरव दिनी नाटकाचा पंचविसावा प्रयोग होत आहे, हा नटराजाचा आशीर्वाद आहे आणि सर्वांसाठीच दुग्ध-शर्करा योग आहे. विक्रमी वेळेत आम्ही या नाटकाचे पंचवीस प्रयोग केले आहेत. आम्हालाही माहित नव्हते पण प्रेक्षकांनीच हे आमच्या ध्यानात आणून दिले. कोणत्याही कलाकारासाठी, निर्मात्यासाठी ही अत्यंत आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्याचवेळी परदेश दौऱ्याची केलेली घोषणाही उत्साह, हुरूप वाढविणारी आहे. आनंद आणि अभिमानाबरोबरच आज उर भरून आला आहे,” ते म्हणाले.
नाटकातील मध्यवर्ती भूमिकेत असलेली आणि नाटकाची एक निर्माती असलेली अमृता खानविलकर म्हणाली, “मी इथे अभिनेत्री आहे आणि निर्मातीही आहे. या नाटकाच्या यशाने मला जो आनंद झाला आहे, तो शब्दांत सांगणे कठीण आहे.”
नाटकाची लेखिका आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी म्हणाली, “हे नाटक सर्व वयोगटांचे, कुटुंबाचे, विनोदाचे आहे आणि त्याहीवर महत्वाचे म्हणजे ते रसिक प्रेक्षकांचे आहे. या नाटकाला रसिकांकडून एवढा प्रतिसाद मिळेल असे मला ते लिहिताना वाटले नव्हते.या नाटकाचे यश हे आमच्या दिग्दर्शकाप्रमाणे निर्माते, कलाकार यांचेही आहे. पण हे नाटक सर्वात महत्वाचे म्हणजे ते डोक्यावर घेणाऱ्या रसिक प्रेक्षकांचे आहे.”
घोषणेपासूनच मराठी नाट्यसृष्टीत प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या ‘लग्नपंचमी’ या नाटकाचा शुभारंभ जानेवारीत झाल्यानंतर महाराष्ट्रभर त्याचे सर्वदूर २५ प्रयोग झाले आहे. सातारा, सांगलीपासून कोथरूड, पुणे आणि मुंबईतील प्रेक्षकांनी या नाटकाला प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

  • Related Posts

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    कोल्हापूर : महाराष्ट्रात एच१ एन१ (स्वाईन फ्लू) आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ क्लेम्स ऑफिसर…

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर