सयाजी हॉटेल्सने सांगलीत ‘एफोटेल बाय सयाजी’द्वारे व्यवसाय-केंद्रित हॉटेल सुरू करत केला धोरणात्मक विस्तार

समूहाच्या या नव्या हॉटेलमुळे पश्चिम महाराष्ट्रातील गजबजलेल्या व्यापारी व कृषी केंद्र असलेल्या सांगलीमध्ये दर्जेदार निवास व्यवस्थेची दीर्घकाळ जाणवत असलेली उणीव भरून निघणार
सांगली, : पश्चिम महाराष्ट्रातील आदरातिथ्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या घडामोडीत सयाजी हॉटेल्सने आपल्या ‘एफोटेल’ ब्रँडअंतर्गत ‘एफोटेल बाय सयाजी, सांगली’ या नव्या हॉटेलच्या सुरूवातीची घोषणा केली आहे. सांगली–मिरज रोडवरील शिव आर सिटी मॉलमध्ये धोरणात्मकदृष्ट्या उभारण्यात आलेले हे हॉटेल सांगली शहरात सयाजी समूहाचा ठळक आणि योग्य वेळी झालेला प्रवेश दर्शवते. व्यापारी व कृषी क्षेत्रात भक्कम ओळख असलेल्या सांगलीमध्ये दर्जेदार ब्रँडेड निवास व्यवस्थेची दीर्घकाळ जाणवत असलेली कमतरता लक्षात घेता, ही नवीन सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.
या नव्या हॉटेलच्या समावेशामुळे ‘एफोटेल बाय सयाजी, सांगली’ हे महाराष्ट्रातील ‘एफोटेल’ ब्रँडचे तिसरे हॉटेल ठरले आहे. यापूर्वी पुणे जिल्ह्यातील सरोला आणि नवी मुंबई येथील हॉटेल्स त्याच्या सिस्टर प्रॉपर्टीज् आहेत. या विस्तारातून सयाजी समूहाची महाराष्ट्रातील उपस्थिती अधिक बळकट होत असून टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये मध्यम-उच्च दर्जाची आदरातिथ्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनाला अधोरेखित करते.
एफोटेल बाय सयाजी, सांगली येथे एकूण ५९ सुबक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज अतिथी कक्ष/ रूम्स उपलब्ध आहेत. हे कक्ष पाच वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागलेले आहेत : १५ ग्रँड रूम्स (२८४ चौ. फूट), ३४ प्रीमियम ग्रँड रूम्स (३०९ चौ. फूट), ६ एक्झिक्युटिव्ह ग्रँड रूम्स (३७३ चौ. फूट), २ ग्रँड सूट्स (५०६ चौ. फूट) आणि २ प्रीमियम सूट्स (७६६ चौ. फूट). व्यवसायिक प्रवासी, विश्रांतीसाठी येणारे पर्यटक तसेच दीर्घकाळ मुक्काम करणाऱ्या पाहुण्यांच्या गरजा लक्षात घेऊन या खोल्यांची रचना करण्यात आली आहे.
या हॉटेलमधील भोजन व्यवस्था हीदेखील एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे. येथे दोन वेगवेगळे फूड अँड बेव्हरेज आऊटलेट्स उपलब्ध आहेत—‘द क्यूब’, १२० आसन क्षमतेचे दिवसभर सुरू असलेले डायनिंग रेस्टॉरंट आणि ‘गुड ओल्ड डेज’, ३० पाहुण्यांसाठी आसन व्यवस्था असलेला बार आहे. या दोन्ही ठिकाणी हॉटेलमध्ये मुक्काम करणाऱ्या पाहुण्यांसह शहरातील नागरिकांनाही दर्जेदार भोजनाचा अनुभव घेता येणार आहे.
या हॉटेलमध्ये ‘जार्डिन १’ आणि ‘जार्डिन २’ असे दोन बहुउपयोगी बँक्वेट हॉल उपलब्ध आहेत. ‘जार्डिन १’ सुमारे ४,२९५ चौ. फूट क्षेत्रफळाचा असून थिएटर पद्धतीच्या आसन व्यवस्थेत ३५० पाहुण्यांपर्यंत क्षमता आहे. तर ‘जार्डिन २’ चे क्षेत्रफळ २,३५५ चौ. फूट असून त्यात थिएटर पद्धतीने १५० पाहुण्यांची व्यवस्था करता येते. या सुविधांमुळे एफोटेल बाय सयाजी, सांगली हे शहरातील एमआयसीई (मीटिंग्स, इन्सेंटिव्ह्स, कॉन्फरन्सेस आणि एक्झिबिशन्स) तसेच सामाजिक कार्यक्रमांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेले प्रमुख ठिकाण ठरणार आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत सांगलीमध्ये उच्च दर्जाच्या बँक्वेट सुविधांची कमतरता असल्याने ही सुविधा शहरासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

  • Related Posts

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी…

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    नॅशनल : खऱ्या भावना आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यातील अनुभव मांडणाऱ्या कथा प्रेक्षकांसमोर आणण्याची आपली वचनबद्धता कायम ठेवत मराठी झी5वर ‘अडकित्ता’चा प्रीमियर 11 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. नातेसंबंध, कुटुंबातील नात्यांची गुंतागुंत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    प्रोजेक्ट ओपन रिव्ह्यू २.० अंतर्गत एआय प्लसचा ‘नोव्हा २ पॉवर’ स्मार्टफोन सादर

    प्रोजेक्ट ओपन रिव्ह्यू २.० अंतर्गत एआय प्लसचा ‘नोव्हा २ पॉवर’ स्मार्टफोन सादर