लहान हातांनी साकारलेल्या मोठ्या स्वप्नांची २२ वर्षे – युवा मास्टरस्ट्रोक २०२५

~ ६,६०० शाळांमधील केजी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या छोट्या कलाकारांनी सर्जनशीलतेला सीमा नसल्याचे केले सिद्ध ~
कोल्हापूर: नवनीत एज्युकेशन लिमिटेडच्या युवातर्फे आयोजित ‘युवा मास्टरस्ट्रोक’च्या २२व्या पर्वाची यशस्वी सांगता झाली. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत या अखिल भारतीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नर्सरीपासून इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या निमित्ताने चित्रकलेच्या माध्यमातून आपली सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि विचार व्यक्त करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते.
दोन दशकांहून अधिक काळापूर्वी सुरू झालेला हा उपक्रम आज एका सर्जनशील चळवळीत परिवर्तित झाला आहे. २०२५च्या पर्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारतभरातील ६,६००हून अधिक शाळांमधील २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने या स्पर्धेत सहभाग घेतला. केवळ प्रतिभेचा गौरव करणे इतकेच या उपक्रमाचे उद्दिष्ट नसून, कलेच्या या सर्वांना समजणाऱ्या माध्यमातून विद्यार्थी गुंतागुंतीचे विचार आणि भावना व्यक्त करण्यास चालना देणारी संस्कृती घडवण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे.
सहभागींचे तीन वयोगटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते –

● गट अ : केजी ते इयत्ता तिसरी
● गट ब : इयत्ता चौथी ते इयत्ता सहावी
● गट क : इयत्ता सातवी ते इयत्ता दहावी

युवा मास्टरस्ट्रोक २०२५ या स्पर्धेच्या प्रत्येक वयोगटातील विजेत्यांची नावे https://masterstroke.navneet.com/ या वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहेत.
श्री. भारत पार्टे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय प्रवेशिकांचे परीक्षण करण्यात आले. जे. जे. कला महाविद्यालयाची पार्श्वभूमी आणि कला क्षेत्रातील अनेक दशकांचा अनुभव असलेल्या श्री. पार्टे यांनी चित्रकृतींचे परीक्षण केले आणि या स्पर्धेचा एकूण उत्साह अधिक उंचावला.
विजेत्यांनी आपापल्या विभागांत कल्पकतेचा सर्वोच्च बिंदू असल्याचे अधोरेखित केले. या गुणवान विद्यार्थ्यांपर्यंत बक्षिसे व अधिकृत मानपत्रे पोहोचावी, यासाठी युवातर्फे शाळा व्यवस्थापन व स्थानिक सेल्स टीमसोबत काम करण्यात येत आहे. आतापर्यंत ४०,००० विजेत्यांना गिफ्ट हॅम्पर मिळाले आहेत.
जिल्हास्तरीय फेऱ्या खास महाराष्ट्र व गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या होत्या. प्रत्येक शाळेतील आघाडीच्या प्रवेशिकांचे काटेकोर परीक्षण केरून युवातर्फे प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येक गटातून एका विजेत्याची निवड करण्यात आली.
युवाचे चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर अभिजीत सान्याल म्हणाले, “मास्टरस्ट्रोक ही कल्पकतेची अभिमानास्पद अभिव्यक्ती आहे. या वर्षी या प्रवासात ६,६००हून अधिक शाळा सहभागी झाल्या आणि त्यांचा उत्साह अतुलनीय होता. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही केवळ चित्रकलेचा महोत्सव साजरा करत आहोतच, त्याचप्रमाणे पुढील पिढीचे विचारवंत, भविष्याची स्वप्ने पाहणारे आणि कलाकार घडवत आहोत.

  • Related Posts

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    कोल्हापूर : महाराष्ट्रात एच१ एन१ (स्वाईन फ्लू) आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ क्लेम्स ऑफिसर…

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर