पीएनजी ज्वेलर्सचा ‘स्वर्ण स्वराज’ : निष्क्रिय सोन्याला अर्थप्रवाहाशी जोडणारा राष्ट्रहिताचा उपक्रम

कोल्हापूर , १४ मे २०२६ : १८३२ साली सुरू झालेल्या पीएनजी ज्वेलर्सने ‘स्वर्ण स्वराज’ या राष्ट्रहिताच्या उपक्रमाची घोषणा केली आहे. देशातील घराघरांत साठवून ठेवलेले निष्क्रिय सोने पुन्हा अर्थचक्रात आणणे, सोन्याच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करणे आणि अधिक जबाबदार पद्धतीने सोन्याचा वापर व खरेदी करण्यास प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
हा उपक्रम म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना सोन्याच्या खरेदीत संयम बाळगण्याचे केलेले आवाहन स्वीकारत, राष्ट्रहिताच्या भावनेतून पीएनजी ज्वेलर्सने दिलेला स्वयंस्फूर्त प्रतिसाद आहे. हा प्रतिसाद केवळ एका व्यवसायाचा नसून, तब्बल १९४ वर्षांपासून भारतीय कुटुंबांशी संस्थेने जोडलेल्या नात्याचा आहे.
या १९४ वर्षांच्या प्रवासात पीएनजी ज्वेलर्सने महामंदी, दोन महायुद्धे, स्वातंत्र्यलढा, फाळणी आणि जागतिक महामारी यांसारख्या अनेक ऐतिहासिक टप्प्यांमध्ये देशासोबत वाटचाल केली आहे. ग्राहकांशी असलेली पीएनजी ज्वेलर्सची नाळ ही केवळ व्यवहारांवर आधारित नसून अनेक पिढ्यांपासून जपलेल्या विश्वासाची आहे. ‘स्वर्ण स्वराज’ हाच त्या विश्वासाचा विस्तार आहे.
भारतीय घरांमध्ये साठवलेले अंदाजे २५,००० टनांहून अधिक सोने आजही देशाची एक मोठी संपत्ती आहे. मात्र त्यातील मोठा हिस्सा लॉकर, तिजोरी आणि वारशातील दागिन्यांमध्ये बंदिस्त राहिला आहे. सोन्याची चमक कमी झालेली नाही; पण देशाच्या अर्थव्यवस्थेकडे जाणारा त्याचा प्रवाह थांबला आहे. याच सोन्याला पुन्हा अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी ‘स्वर्ण स्वराज’ उपक्रम पीएनजी ज्वेलर्स राबवत आहे.
याबाबत बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले,
“जेव्हा देशाचे पंतप्रधान देशवासियांना आवाहन करतात, तेव्हा आम्ही त्याकडे केवळ एका रिटेल ब्रँडच्या नजरेतून पाहत नाही, तर देशाप्रती असलेली आपली जबाबदारी म्हणून प्रतिसाद देतो. गेली १९४ वर्षे पीएनजी ज्वेलर्स भारतीय कुटुंबांच्या आनंद, परंपरा आणि आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांचा विश्वासू भाग राहिले आहे. आज आम्ही त्या विश्वासाला एका मोठ्या राष्ट्रीय उद्दिष्टाशी जोडत आहोत. भारतातील सोने भारतातच प्रवाही राहणे, ही केवळ आर्थिक गरज नाही तर देशासाठी आपण एकत्रितपणे उचलू शकणारे प्रभावी पाऊल आहे.”

  • Related Posts

    रॉयल एनफिल्डने सादर केली क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन

    सोलापूर: मध्यम क्षमतेच्या (२५० सीसी ते ७५० सीसी) मोटरसायकल विभागातील जागतिक अग्रणी रॉयल एनफिल्डने आज २०२६ क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन सादर केली. प्रत्येक राईड अधिक सहज आणि आरामदायी बनवण्याच्या…

    एआय+ नोव्हा 2 पॉवर 5G स्मार्टफोन लाँच; आकर्षक डिझाइनसह दमदार बॅटरीचा संगम

    कोल्हापूर : एआय+ने नोव्हा 2 मालिकेतील नवीन नोव्हा 2 पॉवर 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. आकर्षक डिझाइन, कार्यक्षमता आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी यांचा संगम असलेला हा स्मार्टफोन नव्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    रॉयल एनफिल्डने सादर केली क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन

    रॉयल एनफिल्डने सादर केली क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन
    एआय+ नोव्हा 2 पॉवर 5G स्मार्टफोन लाँच; आकर्षक डिझाइनसह दमदार बॅटरीचा संगम

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान