पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांच्या ‘चूजिंग गोल्ड’ या आत्मचरित्राचे प्रकाशन

१९४ वर्षांच्या वारशाला नवी दिशा देणाऱ्या सहाव्या पिढीतील उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास
पुणे,७ ऑगस्ट २०२६: भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित सराफी व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’चा वारसा वयाच्या मध्यतिशीत स्वीकारलेल्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव, संघर्ष, निर्णय आणि नेतृत्वाचा प्रवास शब्दबद्ध केला आहे. त्यांचे आत्मचरित्र ‘चूजिंग गोल्ड’ हे पेंग्विन रँडम हाऊस इंडिया यांनी राष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केले आहे.
‘चूजिंग गोल्ड’ हे अत्यंत प्रामाणिक आणि वैयक्तिक अनुभवांवर आधारित असे पुस्तक आहे. भारतातील सर्वात जुन्या व्यावसायिक वारशांपैकी एकाचा वारसा तरुण वयात स्वीकारल्यानंतर, आज वयाच्या एकोणपन्नाशीत डॉ. सौरभ गाडगीळ यांनी आपल्या आयुष्याच्या प्रवासाकडे मागे वळून पाहत त्यातील अनुभव, संघर्ष, निर्णय आणि शिकवणी यांचा प्रांजळ वेध घेतला आहे. हा प्रवास बाहेरच्या जगाला दिसणाऱ्या यशाचा नसून, त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या वास्तवाचा आणि त्यातून घडलेल्या व्यक्तिमत्त्वाचा आहे.
या आत्मचरित्रात डॉ. सौरभ गाडगीळ यांच्या आयुष्याला आकार देणारे अनेक महत्त्वाचे क्षण, आजोबा आणि आई यांच्यासोबतचे आयुष्यभर स्मरणात राहिलेले संवाद, काळाच्या ओघात उमगलेल्या गोष्टी तसेच त्यांच्या विश्वास, धैर्य आणि मूल्यांची कसोटी पाहणारे अनेक कठीण निर्णय यांचा प्रामाणिक वेध घेण्यात आला आहे. १९४ वर्षांच्या पीएनजी ज्वेलर्सच्या समृद्ध वारशाची पार्श्वभूमी या कथेला लाभली असली, तरी या पुस्तकाचा केंद्रबिंदू हा स्वतः डॉ. गाडगीळ यांचा व्यक्तिमत्त्व विकास, त्यांचा संघर्ष, त्यांनी घेतलेले निर्णय आणि परंपरेचा सन्मान राखत स्वतःचा स्वतंत्र मार्ग घडवण्याचा प्रेरणादायी प्रवास हा आहे.
पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, “आयुष्य जगताना स्वतःसाठी जो वेळ मिळतो, ज्यात आपण मागे वळून पाहतो, तशी संधी मला कधी मिळाली नाही. या पुस्तकाच्या निमित्तानं पहिल्यांदाच ही संधी मिळाली. स्वतःशी संवाद साधत अनेक प्रश्नांना या निमित्तानं मला सामोरं जाता आलं. आजपर्यंत मी घेतलेल्या कोणत्या निर्णयांचा मला खऱ्या अर्थानं अभिमान आहे? कोणत्या निर्णयाबाबत आजही मनात सल आहे, कोणते निर्णय अनुभवाच्या जोरावर योग्य ठरले आणि कोणते केवळ नशिबाच्या साथीनं योग्य ठरले. या सगळ्या मला पडलेल्या प्रश्नांना मी दिलेलं प्रामाणिक उत्तर म्हणजे ‘चूजिंग गोल्ड’ हे पुस्तक. त्यात कोणताही आडपडदा नाही किंवा यशानंतर निर्माण होणाऱ्या परिपूर्णतेचा कोणता आवही नाही.”
“हे पुस्तक लिहिताना मला सर्वाधिक आश्चर्य वाटले ते म्हणजे माझ्या आयुष्याला आकार देणारे अनेक क्षण किती साधे आणि शांत होते. आजोबांसोबत झालेला एक संवाद, स्वतःपासूनही लपवून ठेवलेले एक अपयश किंवा पंचविशीत दुर्लक्षित केलेला एखादा सल्ला, ज्याचा खरा अर्थ अनेक वर्षांनंतर उमगला. या क्षणांनी मला बॅलन्स शीटमधील आकड्यांपेक्षा अधिक घडवले.
हे पुस्तक मी त्या प्रत्येक स्वप्नाळू व्यक्तीसाठी लिहिले आहे, जी कधीकाळी माझ्यासारखीच महत्त्वाकांक्षी होती, पण अनिश्चिततेशी झुंज देत होती; स्वतःहून कधीही न मागितलेल्या अपेक्षांचे ओझे वाहत होती आणि ‘आपल्यात खरंच ते सामर्थ्य आहे का?’ हा प्रश्न स्वतःलाच विचारत होती. या पुस्तकातून मी यशाचे कोणतेही ठरावीक सूत्र सांगितलेले नाही, कारण यशाला असे कोणतेही एकच सूत्र नसते. मात्र, माझ्या प्रवासातील सत्य अनुभव आणि आयुष्यभर जपलेली मूल्ये मी मनापासून मांडली आहेत. माझी ही कहाणी एखाद्या वाचकाला त्याचा पुढचा कठीण निर्णय अधिक धैर्याने आणि कमी भीतीने घेण्याची प्रेरणा देऊ शकली, तर या पुस्तकाचा हेतू सफल झाला, असे मी मानेन.”
पेंग्विन रँडम हाऊस इंडियाचे लीड – पेंग्विन एंटरप्राइझ, कस्टम पब्लिशिंग, अनुज दत्ता म्हणाले, “प्रकाशक म्हणून आम्ही नेहमी अशा कथा शोधत असतो, ज्या केवळ यशाची गाथा सांगत नाहीत, तर त्यामागचा खरा प्रवासही उलगडतात. ‘चूजिंग गोल्ड’बाबत सर्वात विशेष वाटले ते म्हणजे त्यातील प्रामाणिकपणा. सौरभ यांनी केवळ त्यांच्या यशाविषयी लिहिलेले नाही, तर त्यांच्या आयुष्याला आकार देणारे कठीण निर्णय, अपयश आणि आत्मसंशयाचे क्षणही अत्यंत प्रामाणिकपणे मांडले आहेत. त्यामुळे हे पुस्तक केवळ व्यवसायाच्या यशाची कहाणी न राहता नेतृत्व, जिद्द आणि आत्मविश्वासाचा एक अतिशय वैयक्तिक आणि प्रेरणादायी प्रवास बनते. उद्योजक, व्यावसायिक नेते तसेच करिअरच्या कोणत्याही टप्प्यावर असलेल्या प्रत्येक वाचकाला या पुस्तकातील अनुभवांतून नक्कीच प्रेरणा आणि विचारांची नवी दिशा मिळेल.”
‘चूजिंग गोल्ड’ हे डॉ. सौरभ गाडगीळ यांनी त्यांच्या आयुष्यातील निर्णय, अनुभव आणि शिकवणींचा प्रामाणिक लेखाजोखा म्हणून लिहिले आहे. हे पुस्तक केवळ दागिन्यांच्या व्यवसायाशी संबंधित वाचकांसाठी मर्यादित नसून, वारशाची जबाबदारी पेलणाऱ्या व्यक्ती, स्वतःच्या बळावर यशस्वी वाटचाल घडवणारे उद्योजक तसेच करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर आत्मसंशयाशी सामना करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरेल.

  • Related Posts

    रॉयल एनफिल्डने सादर केली क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन

    सोलापूर: मध्यम क्षमतेच्या (२५० सीसी ते ७५० सीसी) मोटरसायकल विभागातील जागतिक अग्रणी रॉयल एनफिल्डने आज २०२६ क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन सादर केली. प्रत्येक राईड अधिक सहज आणि आरामदायी बनवण्याच्या…

    एआय+ नोव्हा 2 पॉवर 5G स्मार्टफोन लाँच; आकर्षक डिझाइनसह दमदार बॅटरीचा संगम

    कोल्हापूर : एआय+ने नोव्हा 2 मालिकेतील नवीन नोव्हा 2 पॉवर 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. आकर्षक डिझाइन, कार्यक्षमता आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी यांचा संगम असलेला हा स्मार्टफोन नव्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    रॉयल एनफिल्डने सादर केली क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन

    रॉयल एनफिल्डने सादर केली क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन
    एआय+ नोव्हा 2 पॉवर 5G स्मार्टफोन लाँच; आकर्षक डिझाइनसह दमदार बॅटरीचा संगम

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान