यूडब्‍ल्‍यूए इंडियाकडून ऐतिहासिक शिष्यवृत्ती प्रोग्रामची घोषणा

कोल्हापूर, : युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया⁠� (यूडब्‍ल्‍यूए) ने यूडब्‍ल्‍यूए इंडियाच्या माध्यमातून भारतातील विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक शिष्यवृत्ती प्रोग्रामची घोषणा केली आहे. भारतातील बाजारपेठेमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी स्वतंत्र शिष्यवृत्ती कटिबद्धता मानली जात असून गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण अधिक सुलभ करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे व्‍हाइस-चान्‍सलर प्रोफेसर अमित चकमा म्हणाले, “या उपक्रमातून भारताप्रती यूडब्‍ल्‍यूएची दीर्घकालीन कटिबद्धता दिसून येते. आर्थिक मर्यादांमुळे विद्यार्थ्यांच्या महत्त्वाकांक्षेमध्ये अडथळा येऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
यूडब्‍ल्‍यूए इंडियासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून मुंबई आणि चेन्नई येथील कॅम्पसमधून एसटीईएम, व्यवसाय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे अभ्यासक्रम जागतिक उद्योगांच्या मागणीनुसार आणि भारताच्या बदलत्या कार्यबलाच्या गरजांशी सुसंगत असतील.
या बहु-स्तरीय शिष्यवृत्ती आराखड्यामध्ये गुणवत्ता शिष्यवृत्ती, जागतिक उत्कृष्टता शिष्यवृत्ती, इक्विटी आणि सीएसआर-समर्थित निधी तसेच राज्य सरकारांच्या सहकार्याने उपलब्ध संधींचा समावेश आहे. पात्र विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक प्रकारच्या आर्थिक मदतीचा लाभ घेण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विद्यार्थी अधिक माहितीसाठी आणि अर्ज प्रक्रियेसाठी यूडब्‍ल्‍यूए इंडिया अधिकृत वेबसाइट⁠ ला भेट देऊ शकतात.

  • Related Posts

    बीयॉन्‍ड पिंक: हिमालयीन रॉक सॉल्टला वेगळे ठरवणाऱ्या बाबी

    रॉक सॉल्ट (सेंधव मीठ) फार पूर्वीपासून भारतीय परंपरेचा भाग राहिले आहे. आयुर्वेदात नैसर्गिक गुणधर्मांसाठी त्याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. अलिकडच्या काळात, ग्राहक आपल्या आहाराबाबत अधिक जागरूक झाल्यामुळे दैनंदिन स्वयंपाकात…

    AI+ नोव्हा लॅपटॅब; टॅबलेटसह लॅपटॉपसारख्या कामासाठीही सक्षम

    कोल्हापूर : AI+ ने उत्पादकता आणि मनोरंजनाचा अनुभव लक्षात घेऊन Nova LapTab सादर केला आहे. जोडता येणाऱ्या फिजिकल कीबोर्डमुळे हे डिव्हाइस स्ट्रीमिंग, नोट्स काढणे, अभ्यास तसेच लॅपटॉपसारख्या कामांसाठी वापरता येते.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बीयॉन्‍ड पिंक: हिमालयीन रॉक सॉल्टला वेगळे ठरवणाऱ्या बाबी
    AI+ नोव्हा लॅपटॅब; टॅबलेटसह लॅपटॉपसारख्या कामासाठीही सक्षम

    डॉटर्स डे निमित्त क्लिनिक प्लसची नवी चित्रफीत; ‘मुलगी असते आईची मजबुती’

    डॉटर्स डे निमित्त क्लिनिक प्लसची नवी चित्रफीत; ‘मुलगी असते आईची मजबुती’

    लोटस इलेट्रेचा कोल्हापुरात खास ब्रँड अनुभव; २६ व २७ सप्टेंबरला विशेष कार्यक्रम

    लोटस इलेट्रेचा कोल्हापुरात खास ब्रँड अनुभव; २६ व २७ सप्टेंबरला विशेष कार्यक्रम

    रॉयल एनफिल्डने सादर केली क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन

    रॉयल एनफिल्डने सादर केली क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन
    एआय+ नोव्हा 2 पॉवर 5G स्मार्टफोन लाँच; आकर्षक डिझाइनसह दमदार बॅटरीचा संगम