मूल्याधारित गुंतवणुकीच्या संधींमध्ये शिस्तबद्ध सहभागासाठी ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ’चा ‘बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंड’ सादर

मजबूत आर्थिक पाया आणि आकर्षक मूल्यांकन असलेल्या कंपन्यांवर गुंतवणुकीचा भर
नियमाधारित निर्देशांक धोरणामुळे शिस्तबद्ध आणि पारदर्शक गुंतवणुकीची संधी
लार्ज आणि मिड-कॅप कंपन्यांमध्ये विविधीकरणासह गुंतवणुकीची संधी
मुंबई, ११ मे २०२६ : ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स’ने आपल्या युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स (युलिप्स) अंतर्गत ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंड’ सादर केला आहे. मोठ्या आणि मध्यम आकाराच्या व आकर्षक मूल्यांकन असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी देत, दीर्घकालीन संपत्तीनिर्मिती करण्याच्या उद्देशाने हा फंड तयार करण्यात आला आहे.
याबाबत बोलताना ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’चे मुख्य गुंतवणूक अधिकारी मनीष कुमार म्हणाले, “आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंडा’मुळे ग्राहकांना इक्विटी बाजारात गुंतवणूक करण्यासाठी एक संरचित आणि पारदर्शक पर्याय मिळतो. मूलभूतपणे चांगली आर्थिक स्थिती असलेल्या आणि आकर्षक मूल्यांकन असलेल्या कंपन्यांवर या फंडाचा भर आहे. या फंडाची गुंतवणूक धोरणे काही महत्त्वाच्या आधारस्तंभांवर आधारित आहेत. विविध आर्थिक निकषांच्या आधारे मूल्याधारित शेअर्सची निवड, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि बाजार भांडवलाच्या विविध गटांमध्ये गुंतवणूक करून त्यामध्ये विविधीकरण, तसेच ठराविक नियमांवर आधारित शिस्तबद्ध गुंतवणूक प्रक्रिया असे हे आधारस्तंभ आहेत. यासोबतच ठराविक कालावधीनंतर फंडाचा आढावा घेऊन आवश्यक ते बदल आणि संतुलनही राखले जाणार आहे.”
महत्त्वाचे म्हणजे, या पद्धतीमुळे बाजारातील चढ-उतारांच्या काळातही ग्राहक दीर्घकालीन धोरण बाळगून आत्मविश्वासाने ही गुंतवणूक कायम ठेवू शकतात. तुलनेने कमी लक्ष वेधून घेणाऱ्या गुंतवणुकीच्या संधींचाही फायदा त्यांना मिळू शकतो,” असेही मनीष कुमार म्हणाले.
दि. ३० मार्च २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, ‘आयसीआयसीआय प्रु बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू इंडेक्स’ने मागील तीन वर्षांत वार्षिक सरासरी ३२ टक्के, पाच वर्षांत २८.९ टक्के आणि दहा वर्षांत १९.४ टक्के परतावा दिला आहे. बाजारातील विविध चढ-उतारांच्या काळातही शिस्तबद्ध आणि मूल्याधारित गुंतवणूक करण्याच्या पद्धतीची ताकद या कामगिरीतून दिसून येते. हा फंड निष्क्रिय (पॅसिव्ह) आणि निर्देशांकावर आधारित गुंतवणुकीच्या धोरणावर आधारीत आहे. मूळ निर्देशांकाच्या कामगिरीचा मागोवा घेत, मूल्याधारित गुंतवणुकीच्या संधींमध्ये सातत्याने सहभाग मिळवून देणे हा त्याचा उद्देश आहे.
‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंड’ या फंडाची रचना ‘आयसीआयसीआय प्रु बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू इंडेक्स’नुसार करण्यात आली आहे. या निर्देशांकात ‘बीएसई’च्या लार्ज आणि मिड-कॅप गटातील ३० कंपन्यांची निवड केली जाते. ही निवड ‘बुक व्हॅल्यू-टू-प्राइस’, ‘अर्निंग्स-टू-प्राइस’ आणि ‘सेल्स-टू-प्राइस’ अशा मूल्यांकन निकषांच्या आधारे केली जाते. हा खास रचना असलेला फंड ‘बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू इंडेक्स’शी सुसंगत असून, तो ‘इर्डा’च्या नियामक अटींनुसार तयार करण्यात आला आहे. बीएसई लार्ज-मिडकॅप गटातील मूलभूत आर्थिक निकषांवर आकर्षक मूल्यांकन असलेल्या ३० कंपन्यांच्या मूल्याधारित प्रवासाचे चित्र समोर आणणे हा या निर्देशांकाचा उद्देश आहे. नियामक मार्गदर्शक तत्त्वांमुळे एखादा शेअर निवडता आला नाही, तर त्याऐवजी पात्र असलेला पुढील शेअर यामध्ये निवडला जातो; जेणेकरून ३० शेअर्सचा गट कायम राहील. मजबूत आर्थिक पाया आणि बाजारमूल्य यांच्या बरोबरीने आकर्षक मूल्यांकन असलेल्या कंपन्या ओळखण्यासाठी या निर्देशांकात पारदर्शक व नियमाधारित पद्धतीचा वापर करण्यात येतो.
दर सहा महिन्यांनी या निर्देशांकाचा आढावा घेऊन त्यात आवश्यक ते बदल आणि संतुलन केले जाते. त्यामुळे विविध क्षेत्रांमधील बदलत्या गुंतवणूक संधींनुसार फंडाचा पोर्टफोलिओ अद्ययावत राहतो. तसेच विविधीकरण आणि पोर्टफोलिओचे संतुलन राखण्यासाठी शेअर्स आणि क्षेत्रांवरील गुंतवणुकीच्या मर्यादांचाही यात समावेश करण्यात आला आहे.
‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंड’ हा ‘आयसीआयसीआय प्रु सिग्नेचर अश्युअर’, ‘स्मार्टकिड अश्युअर विथ आयसीआयसीआय प्रु सिग्नेचर अश्युअर’, ‘आयसीआयसीआय प्रु स्मार्ट इन्शुरन्स प्लॅन प्लस (एसआयपी+)’ अशा इतर युलिप योजनांद्वारे उपलब्ध होणार आहे. या योजनांमध्ये आयुर्विम्याची सुविधाही असेल. अधिक माहिती www.iciciprulife.com येथे उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांना दीर्घकालीन इक्विटी गुंतवणुकीसोबतच आयुर्विम्याच्या संरक्षणाचाही लाभ एकत्रितपणे मिळू शकणार आहे.

  • Related Posts

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    कोल्हापूर : महाराष्ट्रात एच१ एन१ (स्वाईन फ्लू) आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ क्लेम्स ऑफिसर…

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर