जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स ची नवी शॉर्ट फिल्म ‘द गोधडी इफेक्ट’.

मुंबई,१३ जुलै २०२६: महाराष्ट्रातील प्रसिद्ध दागिन्यांचा ब्रॅंड जगन्नाथ गंगाराम पेडणेकर (जेजीपी) ज्वेलर्सने ‘द गोधडी इफेक्ट’ ही मराठी शॉर्ट फिल्म सर्वांसाठी आणली असून या भारतीय संस्कृतीतील जिव्हाळ्याची नाती दर्शवणारी ही कथा आहे.
जितेंद्र जोशी, मधुराणी गोखले, सई गोडबोले आणि प्रदीप वेलणकर या मराठी कलाकारांनी यात काम केलं असून जुन्या व प्रेमाची ऊब असलेल्या साड्यांपासून बनवलेल्या गोधडीवरून ही गोष्ट प्रेरित आहे. आठवणी नवं रूप घेतात, पण त्या पिढ्यानपिढ्या जिवंत राहतात, हेच ही कथा सांगते.
याच कलाकारांना घेऊन जे.जी.पी. ज्वेलर्सने बनवलेली ही दुसरी कॅम्पेन आहे. या आधी ‘द रिझल्ट’ या सणासुदीच्या फिल्ममध्ये आजच्या कुटुंबातील समानतेबद्दल बोललं गेलं होतं, आणि प्रेक्षकांची कौतुकाची दाद ही मिळाली होती. रोजच्या आयुष्यातील साध्या व अर्थपूर्ण गोष्टींमधून हा ब्रँड लोकांशी नातं जोडत आहे. जुने दागिने म्हणजे फक्त जपलेल्या आठवणींपर्यंत मर्यादित नसून नवीन आठवणी बनवण्याची एक संधीही आहे.
या कॅम्पेनबद्दल बोलताना जगन्नाथ गंगाराम पेडणेकर (जेजीपी) ज्वेलर्सच्या मॅनेजिंग डायरेक्टर आसावरी पेडणेकर म्हणाल्या, “प्रत्येक दागिन्याची स्वतःची एक गोष्ट असते – त्यात सण, नाती आणि पिढ्यांपिढ्या टिकणाऱ्या आठवणी असतात. ‘द गोधडी इफेक्ट’मधून आम्हाला या भावना साजऱ्या करायच्या आहेत, आणि लोकांना गोल्ड एक्स्चेंज ला नव्या नजरेने बघायला सुचवायचं आहे. अद्भूत ह्या आमच्या ब्रॅंड एजन्सिने हा विषय अत्यंत संवेदनशीलतेने हाताळला आहे.”
ही फिल्म आपण इथे पाहू शकता: https://www.youtube.com/watch?v=AoZlVS76bqA
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर (जेजीपी) ज्वेलर्सविषयी:
सन १९५० साली सुरू झालेला जे. जी. पी. ज्वेलर्स (जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स) हा ब्रॅंड महाराष्ट्र आणि गोव्यात स्वतःचं भक्कम स्थान निर्माण करून हळू हळू कोकण, सांगली, कोल्हापूर, मालवण अशा अनेक ठिकाणी ग्राहकांकडून पसंतीस खरा उतरला आहे. शुद्धता, पारदर्शकता, सुंदर कारागिरी आणि ग्राहकांचा विश्वास यासाठी हा ब्रँड ओळखला जातो. इथे सोनं, हिरे, चांदी आणि लग्नासाठीचे दागिने असा मोठा संग्रह मिळतो, जो जुन्या पद्धतीची कारागिरी आणि आजच्या काळातील डिझाइन यांची छान सांगड घालतो. आज २५ शोरूम्स आणि सात दशकांहून जास्त जुना वारसा घेऊन, जे. जी. पी. ज्वेलर्स पिढ्यांपिढ्या ग्राहकांची सेवा करत आहे.
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत, “द गोधडी इफेक्ट” ही फिल्म आवर्जून पाहावी.?v=AoZlVS76bqA

  • Related Posts

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    राष्ट्रीय, 9 ऑक्टोबर 2026: एखाद्या चक्रात अडकल्यावर मुक्तीचा शोध घेणाऱ्या व्यक्तीला त्याच व्यवस्थेचा सामना करण्यास भाग पाडले जाते; ज्यावरचा विश्वास त्याने एकदा गमावला होता. अशास्थितीत नेमके काय घडते? आनंद दिलीप…

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    कोल्हापूर : आदित्य बिर्ला समूहाची प्रमुख कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीजअंतर्गत येणाऱ्या बिर्ला ओपस पेंट्सने ‘बाप्पाचा मान’ या उपक्रमातून कोल्हापूरमधील गणेशोत्सवाच्या सर्जनशीलतेचा आणि सामुदायिक सहभागाचा गौरव केला. या उपक्रमाला शहरातील हाउसिंग सोसायट्यांकडून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    नवीन स्कोडा स्लाविया सर्व काही सांगते—शैली, सार्थकता आणि आत्मविश्वासाचा संगम

    नवीन स्कोडा स्लाविया सर्व काही सांगते—शैली, सार्थकता आणि आत्मविश्वासाचा संगम

    एआय प्लसच्या नोव्हा आणि प्लस मालिकेवर बिग बिलियन डेजमध्ये विशेष सणासुदीच्या किंमती

    एआय प्लसच्या नोव्हा आणि प्लस मालिकेवर बिग बिलियन डेजमध्ये विशेष सणासुदीच्या किंमती

    सोनाली बेंद्रे यांनी केला ‘सोहळा’चा ट्रेलर लॉन्च; बालपण आणि मोठं होण्याच्या सुंदर प्रवासाची झलक

    सोनाली बेंद्रे यांनी केला ‘सोहळा’चा ट्रेलर लॉन्च; बालपण आणि मोठं होण्याच्या सुंदर प्रवासाची झलक

    एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार

    एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार