व्होक्सवॅगन इंडियाचे महाराष्ट्रातील नेटवर्क विस्तारले; छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन डीलरशिपचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर: व्होक्सवॅगन इंडियाने छत्रपती संभाजीनगर येथे नवीन डीलरशिपचे उद्घाटन करत महाराष्ट्रातील आपले नेटवर्क आणखी विस्तारले आहे. या नव्या डीलरशिपच्या उद्घाटनामुळे राज्यातील कंपनीचे नेटवर्क आता 17 सेल्स लोकेशन्स आणि 16 सर्व्हिस आउटलेट्सपर्यंत पोहोचले आहे.
नवीन व्होक्सवॅगन छत्रपती संभाजीनगर आउटलेटमध्ये कंपनीची प्रमुख मॉडेल्स – नवीन टायगन, टायरॉन R-Line, नुकतेच लाँच झालेले टायरॉन लाइफ आणि प्रीमियम सेडान व्हर्टस यांचे प्रदर्शन करण्यात आले आहे. स्वतंत्र सेल्स सुविधेसह जवळच समर्पित स्पेअर्स आणि सर्व्हिस सुविधा उपलब्ध असून, येथे 40 व्यावसायिक कर्मचारी ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये व्हर्टस हे व्होक्सवॅगनचे सर्वाधिक लोकप्रिय मॉडेल ठरले असून, शहरातील ब्रँडच्या एकूण विक्रीपैकी सुमारे 65 टक्के विक्री या मॉडेलची आहे. नवीन डीलरशिपच्या उद्घाटनावेळी कंपनीने एका दिवसात 10 कार्सची मेगा-डिलिव्हरी पूर्ण करत या बाजारपेठेत आपली 3,643 वी कार ग्राहकांच्या स्वाधीन केली.
उद्घाटनानिमित्त पहिल्या 50 ग्राहकांना एक वर्षाचे मोफत सर्व्हिस व्हॅल्यू पॅकेज देण्याची विशेष घोषणा कंपनीने केली आहे.
यावेळी बोलताना व्होक्सवॅगन इंडियाचे ब्रँड डायरेक्टर नितीन कोहली म्हणाले, “महाराष्ट्र ही आमच्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची बाजारपेठ आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आमच्या फ्लॅगशिप SUV टायरॉन R-Line आणि नवीन टायरॉन लाइफचे उत्पादन होत असल्याने या शहराला विशेष महत्त्व आहे. ग्राहकांना जागतिक दर्जाची अभियांत्रिकी, सुरक्षा आणि उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव अधिक सहज उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
व्होक्सवॅगन छत्रपती संभाजीनगरचे मॅनेजिंग डायरेक्टर ऋतुराज देशमुख म्हणाले, “छत्रपती संभाजीनगरमधील प्रीमियम ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आमची प्रशिक्षित आणि ग्राहक-केंद्रित टीम ग्राहकांना उत्कृष्ट विक्री आणि मालकीचा अनुभव देईल, असा आम्हाला विश्वास आहे.”
व्होक्सवॅगन इंडियाचा हा विस्तार ग्राहकांना GNCAP 5-स्टार सेफ्टी रेटेड कार्स आणि जागतिक स्तरावर प्रशंसित मॉडेल्स अधिक सुलभतेने उपलब्ध करून देण्याच्या कंपनीच्या धोरणाचा भाग आहे.

  • Related Posts

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    राष्ट्रीय, 9 ऑक्टोबर 2026: एखाद्या चक्रात अडकल्यावर मुक्तीचा शोध घेणाऱ्या व्यक्तीला त्याच व्यवस्थेचा सामना करण्यास भाग पाडले जाते; ज्यावरचा विश्वास त्याने एकदा गमावला होता. अशास्थितीत नेमके काय घडते? आनंद दिलीप…

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    कोल्हापूर : आदित्य बिर्ला समूहाची प्रमुख कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीजअंतर्गत येणाऱ्या बिर्ला ओपस पेंट्सने ‘बाप्पाचा मान’ या उपक्रमातून कोल्हापूरमधील गणेशोत्सवाच्या सर्जनशीलतेचा आणि सामुदायिक सहभागाचा गौरव केला. या उपक्रमाला शहरातील हाउसिंग सोसायट्यांकडून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    नवीन स्कोडा स्लाविया सर्व काही सांगते—शैली, सार्थकता आणि आत्मविश्वासाचा संगम

    नवीन स्कोडा स्लाविया सर्व काही सांगते—शैली, सार्थकता आणि आत्मविश्वासाचा संगम

    एआय प्लसच्या नोव्हा आणि प्लस मालिकेवर बिग बिलियन डेजमध्ये विशेष सणासुदीच्या किंमती

    एआय प्लसच्या नोव्हा आणि प्लस मालिकेवर बिग बिलियन डेजमध्ये विशेष सणासुदीच्या किंमती

    सोनाली बेंद्रे यांनी केला ‘सोहळा’चा ट्रेलर लॉन्च; बालपण आणि मोठं होण्याच्या सुंदर प्रवासाची झलक

    सोनाली बेंद्रे यांनी केला ‘सोहळा’चा ट्रेलर लॉन्च; बालपण आणि मोठं होण्याच्या सुंदर प्रवासाची झलक

    एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार

    एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार