एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

कोल्हापूर : महाराष्ट्रात एच१ एन१ (स्वाईन फ्लू) आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ क्लेम्स ऑफिसर डॉ. अभिजित घोष यांनी केले आहे.
महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत राज्यात एच१ एन१चे १,१०९ रुग्ण आढळले आहेत. ही संख्या २०२५ मधील संपूर्ण वर्षातील ९४२ रुग्णांपेक्षा अधिक आहे. तसेच, १ जानेवारी ते १४ ऑगस्ट २०२६ दरम्यान डेंग्यूचे ५,५५८ रुग्ण नोंदविण्यात आले असून, मागील वर्षी याच कालावधीत ४,३४४ रुग्ण आढळले होते.
सतत किंवा वाढणारा ताप, तीव्र अंगदुखी, उलट्या, श्वास घेण्यास त्रास किंवा डिहायड्रेशनची लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नये. सुरुवातीलाच डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक चाचण्या केल्यास आजाराचे वेळेवर निदान होऊन गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते, असे डॉ. घोष यांनी सांगितले.
पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छता राखावी, सुरक्षित पिण्याचे पाणी वापरावे आणि डासांची पैदास रोखण्यासाठी परिसरात स्वच्छता ठेवावी. डासांपासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर आजार असलेल्या व्यक्तींनी लक्षणे जाणवल्यास स्वतःहून औषधोपचार न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
आरोग्य-जागृती शिबिरे, वेबिनार, आरोग्य तपासण्या आणि जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून स्टार हेल्थकडून नागरिकांमध्ये मोसमी आजारांबाबत जागरूकता निर्माण केली जात असल्याचे कंपनीने सांगितले.

  • Related Posts

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी…

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    नॅशनल : खऱ्या भावना आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यातील अनुभव मांडणाऱ्या कथा प्रेक्षकांसमोर आणण्याची आपली वचनबद्धता कायम ठेवत मराठी झी5वर ‘अडकित्ता’चा प्रीमियर 11 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. नातेसंबंध, कुटुंबातील नात्यांची गुंतागुंत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर