एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

कोल्हापूर, ऑगस्ट 2026 : एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेडने 45 एचपी क्षमतेचा कुबोटा एमयू 4502 आणि 50 एचपी क्षमतेचा कुबोटा एमयू 5002 हे दोन प्रीमियम युटिलिटी ट्रॅक्टर बाजारात सादर केले आहेत. 41–50 एचपी या वेगाने वाढणाऱ्या ट्रॅक्टर विभागातील कंपनीची उपस्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने ही मॉडेल्स विकसित करण्यात आली आहेत.
या दोन्ही ट्रॅक्टर्सचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे उद्योगातील पहिली 8 वर्षांची हस्तांतरणीय वॉरंटी. ट्रॅक्टरची मालकी बदलली तरी ही वॉरंटी पुढील मालकासाठीही लागू राहणार आहे.
एमयू 4502 आणि एमयू 5002 मध्ये कुबोटाचे जपानी इंजिन, मल्टी-स्पीड सिंक्रोमेश गिअरबॉक्स आणि ड्युअल स्टॅबिलायझर स्प्रिंग तंत्रज्ञानासह पंपा लिफ्ट देण्यात आली आहे. फुल एलईडी लायटिंग, प्रीमियम बकेट सीट, फ्लॅट-डेक प्लॅटफॉर्म, डबल-ॲक्टिंग पॉवर स्टीअरिंग आणि एर्गोनॉमिक कंट्रोल्समुळे चालकाला अधिक आरामदायी अनुभव मिळतो.
हे ट्रॅक्टर्स सुपर सीडर, सीड ड्रिल, बटाटा प्लांटर, मिनी राउंड बेलर आणि कल्टिव्हेटर यांसारख्या विविध शेती अवजारांसोबत वापरता येतात. भात, गहू, मका, कडधान्ये आणि सोयाबीनसह विविध पिकांच्या लागवडीसोबत वाहतूक आणि कंत्राटी शेतीच्या कामांसाठीही ते उपयुक्त ठरणार आहेत.

  • Related Posts

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    राष्ट्रीय, 9 ऑक्टोबर 2026: एखाद्या चक्रात अडकल्यावर मुक्तीचा शोध घेणाऱ्या व्यक्तीला त्याच व्यवस्थेचा सामना करण्यास भाग पाडले जाते; ज्यावरचा विश्वास त्याने एकदा गमावला होता. अशास्थितीत नेमके काय घडते? आनंद दिलीप…

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    कोल्हापूर : आदित्य बिर्ला समूहाची प्रमुख कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीजअंतर्गत येणाऱ्या बिर्ला ओपस पेंट्सने ‘बाप्पाचा मान’ या उपक्रमातून कोल्हापूरमधील गणेशोत्सवाच्या सर्जनशीलतेचा आणि सामुदायिक सहभागाचा गौरव केला. या उपक्रमाला शहरातील हाउसिंग सोसायट्यांकडून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    नवीन स्कोडा स्लाविया सर्व काही सांगते—शैली, सार्थकता आणि आत्मविश्वासाचा संगम

    नवीन स्कोडा स्लाविया सर्व काही सांगते—शैली, सार्थकता आणि आत्मविश्वासाचा संगम

    एआय प्लसच्या नोव्हा आणि प्लस मालिकेवर बिग बिलियन डेजमध्ये विशेष सणासुदीच्या किंमती

    एआय प्लसच्या नोव्हा आणि प्लस मालिकेवर बिग बिलियन डेजमध्ये विशेष सणासुदीच्या किंमती

    सोनाली बेंद्रे यांनी केला ‘सोहळा’चा ट्रेलर लॉन्च; बालपण आणि मोठं होण्याच्या सुंदर प्रवासाची झलक

    सोनाली बेंद्रे यांनी केला ‘सोहळा’चा ट्रेलर लॉन्च; बालपण आणि मोठं होण्याच्या सुंदर प्रवासाची झलक

    एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार

    एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार