कोल्हापूर : आदित्य बिर्ला समूहाची प्रमुख कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीजअंतर्गत येणाऱ्या बिर्ला ओपस पेंट्सने ‘बाप्पाचा मान’ या उपक्रमातून कोल्हापूरमधील गणेशोत्सवाच्या सर्जनशीलतेचा आणि सामुदायिक सहभागाचा गौरव केला. या उपक्रमाला शहरातील हाउसिंग सोसायट्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सुमारे ३० प्रवेशिका प्राप्त झाल्या.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांना ‘गणेशाज ड्रीम होम’ ही संकल्पना साकारण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. सहभागी कम्युनिटीजनी आकर्षक सजावट, अनोख्या संकल्पना आणि पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे आपली सर्जनशीलता सादर केली. इको-फ्रेंडली मूर्ती, पुनर्वापर करता येणारे साहित्य आणि जबाबदार कचरा व्यवस्थापन यावरही विशेष भर देण्यात आला.
प्रवेशिकांचे मूल्यांकन ‘बेस्ट बिर्ला ओपस हाऊस ऑफ गणपती’, ‘मोस्ट युनिक मूर्ती’ आणि ‘बेस्ट इको-फ्रेंडली मंडळ’ या तीन श्रेणींमध्ये करण्यात आले. सर्जनशीलता, नाविन्यपूर्णता, अंमलबजावणी आणि एकूण परिणाम या निकषांवर ज्युरीने विजेत्यांची निवड केली.
विजेत्यांमध्ये बेस्ट बिर्ला ओपस हाऊस ऑफ गणपती – सुभल रेसिडेन्सी, देवघर पानंद रोड; मोस्ट युनिक मूर्ती – वर्धमान नगर, राजारामपुरी; तर बेस्ट इको-फ्रेंडली मंडळ – ओम दत्ता चिली पार्क, प्रतिभानगर यांचा समावेश आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी विजेत्या सोसायट्यांना भेट देऊन सहभागींचा सत्कार केला. विजेत्यांना रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देण्यात आली. तसेच सहभागी प्रत्येक सोसायटीला ५ हजार रुपयांची प्रोत्साहन रक्कम देण्यात आली. या उपक्रमातून बिर्ला ओपस पेंट्सने रंग, सर्जनशीलता आणि पर्यावरणपूरक विचारांच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या सामुदायिक भावनेचा गौरव केला.






