कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूर शहराची हद्ववाढ रद्द करण्यासाठी प्राधिकरण नावाच भूत ग्रामीण भागावर लादण्यात आलेले आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील बांधकाम परवाने संबंधित तहसीलदाराकंडून बंद करण्यात आल्याने ग्रामीण भागातील घर बांधणारा शेतकरी, शेतमजूर अडचणीत सापडला आहे. त्यामुळे ग्रामीण भागावर लादण्यात आलेले प्राधिकरण रद्द करावे अशी प्रमुख मागणी शिवसेनेच्या वतीनं जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी केलीयं.सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आलयं.
कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासाठी ग्रामीण भागात प्राधिकरण लागू करण्यात आलयं. मात्र प्राधिकरणाकडून सामान्य लोकांना कोणताही प्रतिसाद मिळत नाही. कारण आजपर्यंत ६१२ अर्ज दाखल झाले असून फक्त १४९ लोकांनाच बांधकाम परवानगी मिळाली आहे. प्राधिकरण स्थापन झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यात वास्तविक ग्रामीण भागातील घर बांधणारा शेतकरी, शेतमजूर अडचणीत आला आहे. त्यामुळे बेकायदेशीर बांधकामे वाढली तर शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. सामान्य शेतकरी, शेतमजूर कष्टकरी लोकांचे बँकेचे कर्ज घेवून घर बांधणीचे स्वप्न अर्पूण राहिले आहे.त्यामुळे तात्काळ प्राधिकरण रद्द करण्यात यावे आणि पूर्वी प्रमाणे तालुक्यातील सर्व तहसीलदारांना बांधकाम परवानगीचे अधिकार पूर्ववत द्यावेत अशी प्रमुख मागणी शिवसेनेच्या वतीने निवेदणाद्वारे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या कडे करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण,करवीर तालुका प्रमुख विराज पाटील,युवा सेना विस्तारक हर्षल सुर्वे,युवा सेना जिल्हा संघटक मंजित माने,राजू यादव यांच्या सह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.