कोल्हापूर /प्रतिनिधी
देशात एअरटेल, वोडाफोन ,आयडिया आणि जीओ या प्रमुख खासगी दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या कंपन्या असून या सर्व च कंपन्यांनी ३ डिसेंबर पासून आपल्या सेवा शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे.३५,१९९,४९९ रुपयांचे रिचार्ज अनुक्रमे ५०,२४९,६५०रु.पर्यंत वाढवलेले आहेत.याचा सर्वसामान्य ग्राहकांना मोठा आर्थिक भुंर्दड बसत आहे.त्यामुळे केंद्र सरकारने आणि भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने या कंपन्यांना दरवाढीला स्थगिती द्यावी तसेच पूर्ण क्षमतेची इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी व कव्हरेज क्षेत्राची व्याप्ती वाढविण्यासाठी योग्य ती कारवाई करावी अशी प्रमुख मागणी कोल्हापूर जनशक्ती च्या वतीनं करण्यात आलीयं. सदर मागणीचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीनं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आलयं.
निवेदनात म्हटलं आहे की भारतीय दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख खाजगी कंपन्यांनी आपल्या मोबाईल प्रीपेड सेवा शुल्कांत ४० टक्के वाढ केलेली आहे. त्यामुळे सर्वच कंपन्यांच्या टेरिफ दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला बसला आहे. मुळातच या कंपन्याद्वारे दिले जाणारी इंटरनेट सेवा ,नेटवर्क कव्हरेज हे नियमानुसार केले जात नसून यामध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. असे असतानाच मोठ्या प्रमाणात रिचार्ज चे दर वाढविणे हे चुकीचे आहे.मोबाईल व इंटरनेट सुविधा ही आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अत्यावश्यक सेवा मानली जाते.आज सरासरी सर्वच घटकांतील व वर्गातील लोकांकडे सुविधा पोहोचलेली आहे. विद्यार्थ्यांपासून नोकरदार व महिलांपासून जेष्ठापर्यंत सर्वचजण इंटरनेटचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करत असतात. महाविद्यालयीन युवकांसाठी तर विविध विषय अभ्यासासाठी या सुविधा वरदान ठरतात. असे असताना आपल्या सेवा शुल्कात वाढ करुन कंपनीने सामान्य ग्राहकांवर नाहक भार टाकला आहे. तर सर्वसामान्य ग्राहक अडचणीत आला आहे.त्यामुळे केंद्र सरकारने आणि भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने या कंपन्यांना दरवाढीला स्थगिती द्यावी तसेच पूर्ण क्षमतेची इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी व कव्हरेज क्षेत्राची व्याप्ती वाढविण्यासाठी योग्य ती कारवाई करावी अशी प्रमुख मागणी कोल्हापूर जनशक्ती च्या वतीनं करण्यात आलीयं. सदर मागणीचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीनं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आलयं.
यावेळी समीर नदाफ,आण्णा पिसाळ,अरुण अथणे,विश्वास नाईक, ईश्वरप्रसाद तिवारी, संतोष आपटे, दिपक खांडेकर, एम.डी.कुंभार,राजेंद्र लोखंडे,अनिष पोतदार, तय्यब मोमीन, अनिल कुराडे,समीर जमादार, रियाज बेपारी,सुनील दमे उपस्थित होते.