यंदाच्या नववर्ष स्वागतानिमित्त सोनी सब आपल्या रोमांचक ‘खुशियोंवाला न्यू इअर‘ स्पर्धेच्या माध्यमातून १०० चाहत्यांना त्यांच्या कुटुंबांच्या जवळ जाण्याची संधी देणार आहे. चॅनेलच्या ‘खुशियोंवाली फिलिंग‘ पसरवण्याच्या तत्त्वाशी कायम राहत सोनी सब देशभरातील १०० चाहत्यांना विमानाची तिकिटे देणार आहे. ज्यामुळे त्यांना त्यांचे कुटुंब व प्रियजनांसोबत नववर्ष स्वागताचा आनंद साजरा करण्याची संधी मिळेल.
नवीन वर्ष हा नवीन शुभारंभांचा क्षण असतो. आपल्या प्रियजनांसोबत वर्षातील हा अत्यंत महत्त्वाचा क्षण साजरा केल्याने अत्यंत आनंद मिळतो. या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी चाहत्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून यंदाच्या नववर्ष स्वागताचा आनंद त्यांच्या कुटुंबांसोबत का साजरा करायचा आहे, याबाबत कथा शेअर करण्याची गरज आहे. चाहते व्हॉट्स क्रमांक +९१ ७०३९८८३३६६ वर टेक्स्ट, ऑडिओ किंवा व्हिडिओ मॅसेज पाठवू शकतात. यामधून लक्षवेधक कथा असलेले चाहते त्यांच्या होमटाऊनमध्ये जाण्यासाठी रिटर्न एअर तिकिटांसाठी पात्र ठरतील. सोनी सबचा हा उपक्रम वर्षानुवर्षे त्यांच्या सर्व मालिकांवर प्रेम करणा-या व पाठिंबा देणा-या चाहत्यांचे आभार मानण्याचा चॅनेलचा एक प्रयत्न आहे.
यंदाच्या वर्षाच्या सुरूवातीला सोनी सबने नवीन ब्रॅण्ड तत्त्व ‘खुशियोंवाली फिलिंग‘ सादर केले. ज्यामधून आमच्या चॅनेलवरील मालिकांचे स्वरूप दिसून येते आणि या उपक्रमाला व या तत्त्वाला चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी चालना मिळते. सोनी सब ११ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑन-एअर कॉन्टेस्ट राबवणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ इच्छिणारे चाहते अधिक माहितीसाठी आणि स्पर्धेचे नियम व अटी जाणून घेण्यासाठी https://sabtv.com/en_in/ येथे भेट देऊ शकतात.
सोनी सबवरील मालिका ‘जीजाजी छत पर हैं‘मध्ये ईलायचीची भूमिका साकारणारी हिबा नवाब म्हणाली, ”या अनोख्या उपक्रमासाठी सोनी सबचे आभार. आपल्या कुटुंबांपासून दूर असलेले माझ्यासारखे लोक या कॅम्पेनचे महत्त्व समजू शकतात. मी गेल्या २ वर्षांपासून माझ्या कुटुंबापासून दूर आहे. माझी नेहमीच इच्छा राहिली आहे की, काहीतरी जादू होवो आणि मला नववर्षाचे स्वागत करण्याचा आनंद त्यांच्यासोबत साजरा करायला मिळो. मी सोनी सबचा चाहत्यांमध्ये ‘खुशियोंवाली फिलिंग‘ पसरवण्याच्या या प्रयत्नाचे कौतुक करते. मी टीमला शुभेच्छा देऊ इच्छिते. मला खात्री आहे की, या उपक्रमासाठी अधिकाधिक प्रवेशिका मिळतील.”