सोनी सबवरील काल्पनिक मालिका ‘बालवीर‘ने लक्षवेधक पटकथेसह देशभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच गुगलचा २०१९ साठी वार्षिक ट्रेण्ड्स अहवाल ‘इअर इन सर्च‘च्या मते या मालिकेला जगभरात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या भारतीय टेलिव्हिजन मालिकांच्या यादीमध्ये स्थान मिळाले आहे.
नुकतेच गुगलवर सादर करण्यात आलेला अहवाल ‘इअर इन सर्च‘मध्ये जागतिक स्तरावर २०१९मध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या विषयांच्या माहितीचा समावेश आहे. गुगलने २०१९ मध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या गोष्टी किंवा सर्वात मोठ्या ट्रेण्ड्सकडे पाहिले. हिंदी जनरल एंटरटेन्मेंटमधील बालवीर ही एकमेव भारतीय टेलिव्हिजन मालिका जगभरातून टेलिव्हिजन शोजसाठी करण्यात आलेल्या टॉप सर्चेसमध्ये समाविष्ट होती.
वीर लोक व काल लोक या दोन जादुई विश्वांच्या पार्श्वभूमीला सादर करणारी मालिका ‘बालवीर रिटर्न्स‘ ही भारतीय टेलिव्हिजनवरील भारताची सर्वात लोकप्रिय काल्पनिक मालिका आहे. सोनी सब या भारतातील आघाडीच्या हिंदी जनरल एंटरटेन्मेंट चॅनेलने सप्टेंबरमध्ये ‘बालवीर रिटर्न्स‘सह मालिकेचे नवीन पर्व सादर केले. या नवीन पर्वामध्ये देव जोशी, पवित्रा पुनिया व शर्मिली राज यांच्यासह इतर प्रतिभावान कलाकार देखील आहेत. गुगलवर या मालिकेबाबत सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे. ‘बालवीर रिटर्न्स‘मध्ये अत्याधुनिक सेट्स, आनंददायी अत्याधुनिक व्हीएफएक्स आणि नवीन पटकथेसह आकर्षक नवीन पात्रे आहेत. मजेशीर बाब म्हणजे ‘बालवीर रिटर्न्स‘ २०१९ साठी गुगल ‘इअर इन सर्च‘वर ‘ब्रेकआऊट‘ सर्च टर्म ठरली आहे. (संदर्भ – Google trend report)
सोनी सबच्या प्रेक्षकांसाठी ‘बालवीर‘ ही फक्त मालिका नसून भारतीय टेलिव्हिजनवरील एक दिग्गज मालिका आहे. २०१६ मध्ये रोमांचपूर्ण प्रवासासह मालिकेचे पहिले पर्व पूर्ण झाले होते. मालिकेच्या पहिल्या पर्वाने १००० हून अधिक एपिसोड्सचा टप्पा गाठला होता. बालवीरची लोकप्रियता एवढी मोठी आहे की पहिले पर्व संपल्यापासून चार वर्षानंतर देखील मालिका सोनी पिक्चर्स नेटवर्कचे ऑनलाइन स्ट्रिमिंग व्यासपीठ सोनी लिव्हवर मालिका पाहिली जात होती. नवीन पर्वासाठी चाहत्यांकडून होणारी मागणी आणि मालिकेप्रती आवड पाहून सोनी सबने यंदाच्या वर्षी टेलिव्हिजन स्क्रिनवर भव्य अवतारामध्ये बालवीरची जादू पुन्हा आणण्याचे ठरवले.
टिप्पणी:
नीरज व्यास, व्यवसाय प्रमुख, सोनी सब, पल आणि सोनी मॅक्स मूव्ही क्लस्टर-”गुगलवर जागतिक स्तरावरील सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या शोजमधील एकमेव भारतीय जीईसी मालिका असणे हे एक मोठे यश आहे. आम्ही सतत प्रेम व पाठिंबा देणा-या आमच्या सर्व चाहत्यांचे आभार मानतो. त्यांनी बालवीर आणि आमच्या सर्व मालिकांना दरवर्षी लोकप्रियतेची नवी उंची गाठताना पाहिले आहे. सर्व कलाकार आणि टीमने अथक मेहनत घेत ‘बालवीर रिटर्न्स‘ला भव्य यश मिळवून दिले आहे. आमचा नेहमीच लोकांच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न राहिला आहे. म्हणूनच आमच्या सर्व ऑफरिंग्जमध्ये हलक्या-फुलक्या कन्टेन्टचा समावेश राहिला आहे. कुटुंबातील सदस्यांना हा कन्टेन्ट आवडतो. ज्यामुळेच आम्ही आमच्या प्रतिस्पर्धी चॅनेल्सपेक्षा उजवे ठरतो. आमची प्रेक्षकांशी जुडली जाणारी पात्रे निर्माण करण्याची क्षमता आहे. ‘बालवीर रिटर्न्स‘चे यश हे याचाचा खरा पुरावा आहे.”