कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूरातील दलित समाजातील गोरगरीब ,असहाय्य ,निराधार ,बेघर देवदासी महिलांना संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती लाभ मिळण्यासाठी शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास त्वरित मंजुरी मिळावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील देवदासी महिलांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर वारंवार निवेदन, आंदोलने,मोर्चाद्वारे शासनाचं लक्ष वेधण्याचं प्रयत्न करण्यात आलयं. मात्र शासनानं याकडे काना डोळा केल्याने आता बस झालं आता सामुदायिक आत्मदहनाशिवाय पर्याय नाही असा असा इशारा नेहरू युवा देवदासी विकास मंडळाच्या वतीनं माजी नगरसेवक अशोक भंडारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील देवदासी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे देण्यात आलायं.तर सदर मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासानस देण्यात आलं.यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आलीत.
दरम्यान कोल्हापूरातील दलित समाजातील गोरगरीब ,असहाय्य ,निराधार ,बेघर देवदासी महिलांना संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती लाभ मिळण्यासाठी शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास त्वरित मंजुरी मिळावी,विधवा,परित्यक्त्या,वयोवृद्ध, निराधारांना राज्य शासनाने दरमहा १हजार रुपये केलेली अनुदान वाढ सहा महिन्यापासून मिळालेली नाही. ती फरकासह मिळावी, देवदासींच्या घरकुल प्रस्तावास मंजूरी मिळावी या प्रमुख मागण्यासंह अन्य मागण्या करण्यात आल्या.
मोर्चात नेहरू युवा देवदासी विकास मंडळाचे पदाधिकारी,जिल्ह्यातील देवदासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.