कोल्हापूर/प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील मांढरे येथील तरुणांचा शेतातील झाड तोडताना विजेच्या तारेचा शॉक लागून मृत्यू झाला.स्वप्नील सर्जेराव भावके(वय.२२) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.सदर घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.या घटनेमुळे मांढरेत हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की करवीर तालुक्यातील मांढरे गावात स्वप्नील सर्जेराव भावके हा आपल्या कुटुंबियांसोबत राहतो. तो केएमसी कॉलेजच्या कला शाखा द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. तो शिक्षण घेत शेतातील काम करत होता. दरम्यान आज दुपारी जेवण करून शेतात ऊस तोडणी आल्याने शेतात गेला होता.तर शेतातील झाडाच्या फांद्या तोडताना अचानक स्वप्नीलला शेतावरून गेलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागला. शॉक लागल्याने स्वप्नील झाडावरून खाली कोसळल्याने तात्काळ परिसरातील शेतकऱ्यांनी स्वप्नीलला बेशुद्ध अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच स्वप्नीलचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.त्याच्या पश्चात्य आई,वडील,आज्जी आणि आजोबा असा परिवार आहे.