कोल्हापूर /प्रतिनिधी
अखिल भारतीय चित्रपट कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी संजय पाटील यांची निवड झाली.
मुंबई येथे गेल्या आठवड्यात आॅल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (इंटक संलग्न) च्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक संपन्न झाली. ही संघटना चित्रपट ,टीव्ही मालिका ,कलाकार, फिल्ड वर्कर्स यांच्या आर्थिक व सामाजिक हक्काच्या संबंधाने काम करणारी देशपातळीवरील संघटना असून संघटनेच्या माध्यमातून गरजू आणि ज्येष्ठ सभासदांसाठी कल्याणकारी योजना यासह अनेक कर्मचाऱ्यांच्या सुविधांसाठी काम करण्यात येत आहे. दरम्यान नुकत्याच मुंबई येथे राष्ट्रीय कार्यकारणीच्या झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी राष्ट्रीय पदाधिकारी आणि विविध राज्यांचे प्रदेश अध्यक्ष जाहीर केले. यावेळी कोल्हापूरच्या संजय पाटील यांची अखिल भारतीय चित्रपट कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी संजय पाटील म्हणाले चित्रपट कर्मचाऱ्यांना विविध सोयीसुविधा मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल.